हिंगोली जिल्ह्यातील पेडगाव वाडी येथे कृषी विभागामार्फत ई पीक पाहणी बर्याच शेतकऱ्यांचा प्रतिसाद
ई पीक पाहणी कार्यक्रम आज दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ मिळाली असून आज दिनांक 12. 9 .2021 रोजी मौजे पेडगाव वाडी तालुका जिल्हा हिंगोली येथे ई पीक पाहणी नोंदणी करणे या बाबत कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला कृषी सहाय्यक आदिल सरदार यांनी ई पीक पाहणी नोंदणी ॲप मध्ये कशाप्रकारे कशा पद्धतीने करायची आहे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना सोबत चर्चा केली त्यांच्या शंकेचे समाधान केले शेतकऱ्यांना जर ई पिक पाहणी केली नाही तर आपले शेत पडीत दाखवल्या जाईल किंवा पेरणी झाली नाही असे दाखवल्या जाईल पुढील हंगामामध्ये बँकेकडून पीक कर्ज घेताना अडचणी निर्माण होतील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही शासनाने एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर केली तर आपण आपली पीक नोंदणी न केल्याने शासनाद्वारे मिळणारी मदत आपणास मिळणार नाही तुमच्या शेतामधील पिकाची जंगली जनावरा मार्फत पिकाचे नुकसान झाल्यास आपल्या कुठल्याच प्रकारची मदत मिळणार नाही त्यामुळे ई पीक पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच कुर्षी विभागामार्फत मिळणारे अनुदान देखील मिळण्यास अडचणी निर्माण होतील असे शेतकऱ्यांना सांगितले अशाप्रकारे आपले नुस्कान होईल सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी नोंदणी करण्या बाबत सांगण्यात आले ई पीक पाहणी कार्यक्रमास दिनांक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी ॲप मध्ये आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी हिंगोली श्री उमाकांत पारधी तहसीलदार हिंगोली श्री संदीप राजापुरे तालुका कृषी अधिकारी हिंगोली श्री गोविंद बंटेवाड यांनी केली आहे.
إرسال تعليق