वसमत शहरातील गुटखा माफिया विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही, साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त.
जिल्ह्यातील एकाही अवैध धंदे चालकास सोडणार नाही ....!
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
दिनांक 9/ 9/ 2021रोजी पहाटेच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील गुटखा माफिया नामे अब्दुल मुखीद अब्दुल वहिद राहणार शिवनेरी नगर वसमत याच्या घरांमध्ये अवैधरित्या विमल ,वजीर, गोवा, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केलेली आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना भेटली असता पोलीस अधीक्षक श्री राकेश कलासागर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, श्रीमती नाज पठाण यांच्या पथकाने छापा मारून घरामध्ये साठवलेला साडेचार लाखाचा गुटखा जप्त करून
जिल्ह्यातील अवैध व्यवसायिक यांचे धाबे दणाणले असून अनेक राजकीय पाठबळ देणाऱ्याचे आता कारवाई मुळे अवसान गळाले आहे
सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख
आरोपी अब्दुल मुखिद अब्दुल वहिद यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन वसमत शहर येथे गुन्हा दाखल केला असून आरोपी पोलिसांना पाहून घराच्या छतावरून पळून गेलेला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री शिवसांब घेवारे, पोलिस जमादार संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे, वसमत चे एएसआय सिद्दिकी, महिला पोलीस अंमलदार श्रीमती नाज पठाण, जमादार पोले यांच्या पथकाने कारवाईमध्ये सहभाग घेतला होता
إرسال تعليق