सेनगावात मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; 21 मोबॉईल, चार दुचाकीसह 5.14 लाखाचा ऐवज जप्त



सेनगावात मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; 21 मोबॉईल, चार दुचाकीसह 5.14 लाखाचा ऐवज जप्त

हिंगोली जिल्ह्यातील 
सेनगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मटका अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात २१ मोबॉईल, चार दुचाकी अन रोख रकमेसह ५.१४ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी २८ जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २२ गुन्हा दाखल झाला आहे.
 सेनगाव येथील बसस्थानकालगत एका ठिकाणी शटरमध्ये मटका व जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे,  सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, जमादार बालाजी बोके, भगवान आडे, राजू ठाकूर, शंकर ढोंबरे, टापरे, आकाश पायघन, किशोर सावंत, प्रशांत वाघमारे, तुषार ठाकरे, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे यांच्या पथकाने गुरुवारी ता. २१ रात्री छापा टाकला.
पोलिसांना पाहताच मटका बहाद्दरांमध्ये धावपळ झाली. मात्र पोलिसांनी कोणालाही पळण्याची संधीच दिली नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी २१ मोबॉईल, ४ दुचाकी वाहने, मटक्याचे साहित्य, तितली भवरा जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ५.१३ लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.

  पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या तक्रावरून अनिल जाधव, गंगाधर मंदाडे, ओमकार लोखंडे, प्रकाश राऊत, सिध्दार्थ खिल्लारे, प्रभाकर गव्हाणे, संदीप पोले, कैलास तावरे, जयपाल खंदारे, जगन कऱ्हाळे, शिवकांत मामीडवार, संतोष जाधव, रियाजखान, डिगांबर शिंदे, सुरेश बोरकर, कैलास इंगोले, राजेश्वर जाधव, बाबुराव पाटेकर, गजानन गिरी, काशीनाश वैद्य, रामप्रसाद गट्टाणी, रमेश जाधव, सय्यद जावेद, जगन गिते, कैलास चिंचोके, बद्री गाडे, बापु ठमके, पांपटवार याच्या विरुध्द शुक्रवारी ता. २२ पहाटे सेगनाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करीत आहेत.


Post a Comment

أحدث أقدم