विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये पहिली व दुसरी धनगर समाजाच्या मुलांना मोफत प्रवेश
तरी परिसरातील व जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आव्हान विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा चे अध्यक्ष श्री. भास्करराव रामराव बेंगाळ साहेबांनी केले आहे. राज्य शासनाने धनगर समाजाला आदिवासी समाजाला सवलती देण्याचे जाहीर केले असून त्याचाच एक भाग म्हणून धनगर समाजाच्या मुलांनी या शैक्षणिक योजनेचा लाभ घ्यावा या उद्देशाने पहिली व दुसरी वर्गामध्ये इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये निशुल्क प्रवेश मिळणार आहे. तसेच शहरी भागातील नामांकित शाळेमध्ये आदिवासी समाजाच्या धरतीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरीता विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली संचलित कै. लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या शाळेला 100 विद्यार्थ्यांची मान्यता मिळालेली आहे तरी येथे प्रवेश देणे सुरू आहे. तरी परिसरातील पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल हिंगोली यांनी केले आहे. तरी शैक्षणिक सत्र 2020-21 यावर्षी चालू वर्षांमध्ये याचा लाभ मिळणार आहे तरी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा. संपर्क प्राध्यापक अभिषेक भास्करराव बेंगाळ- 9834855210
إرسال تعليق