वंचित च्या वतीने कनेरगाव नाका येथे रस्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा करा
महाराष्ट्र 24 न्यूज
13ऑक्टोंबर 2021
हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशा घोषणा देत कनेरगाव नाका येथे वंचित च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट प्रति हेक्टर 50 हजार रुपये अनुदान जमा करण्यात यावे.
शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, विमा कंपन्यांनी तात्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच खाजगी बँकांनी पीक कर्ज वसुलीसाठी सक्ती करू नये या मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करून पुढील दिशा तीव्र करण्यात येईल असा इशारा वंचित चे विधानसभा उमेदवार मा.जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख यांनी दिला आहे.सदर आंदोलन वंचितचे मा. जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कनेरगाव नाका येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रस्ता रोको आंदोलनामुळे हिंगोली वाशिम रस्ता जवळपास दोन तास बंद होता. आंदोलनात वसीम देशमुख, डॉ अमोल रसाळ ,सय्यद रहीम, जुबेर पठाण, सय्यद वसीम ,नामदेव कांबळे, अखिल खान ,कलीम आतार, आदिल खान, आसिफ शेख ,साहेबराव कांबळे तसेच वंचित च्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
إرسال تعليق