हिंगोली जिल्ह्यातील बचत गटांना आतापर्यंत कोटी रुपयांचे कर्ज वाटप मुख्याधिकारी संजय दैने

केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सुचणे नुसार आझादी का अमृत मोहत्सव व माझी सुरक्षा मोहीम अंतर्गत मा.जिल्हाधिकारी हिंगोली श्री जितेंद्र पापळकर व मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री संजय दैने यांच्या सूचनेप्रमाणे मा.प्रकल्प संचालक श्री निलेश कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवडया पासुन बचत गटांना विविध बँका मार्फत कर्ज वाटप करण्या करीता जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाकडून बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये  ‘महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या”  23  शाखानी 157 बचत गटांना 1 कोटी 92 लाख रु, “ स्टेट बँक ऑफ इंडिया” यांच्या 13 शाखेने 162 गटांना 1 कोटी 81 लाख 50  हजार रु,आणि आज बँक ऑफ महाराष्ट्र च्या 3 शाखेने 69 बचत गटांना 72 लाख, इको बँकेने 5 गटांना 6 लाख रु, युनियन बँकेने 12 गटांना 26 लाख रु,बँक ऑफ बडोदा 20 गटाला 24 लाख रु,कॅनरा बँक 9 बचत गटाला 16 लाख रु, बँक ऑफ इंडिया 3 शाखाने 35 गटांना 51लाख 60 हजार रु,असे एकून 3 मेळाव्यात एकून 469 बचत गटांना 5 कोटी 69 लाख 10  हजार रु वाटप करण्यात आले आहे.
          यापुर्वी बँकांनी बँक स्तरावर 369 बचत गटांना 4 कोटी 66 लाख 26 हजार कर्ज वाटप केले आहे. हिंगोली जिल्ह्याला चालू वर्षा करिता 210 बचत गटांना 37 कोटी 80 लाख कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असून, आज तारखेपर्यंत जिल्ह्यातील सर्व बँकांनी 838 गटांना 10 कोटी 35 लाख 36 हजार रु कर्ज वाटप करण्यात आले आहे.त्याची भौतिक टक्केवारी 43.93%व आर्थिक टक्केवारी 27.39% आहे. सदरील मेळाव्यामध्ये प्रकल्प संचालक निलेश कानवडे यांनी बचत गटाने  घेतलेल्या कर्जातून व्यवसाय सुरु करन्याबाबत मार्गदर्शन केले. बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी श्री गुरलेवाड यांनी बचत गटाने कर्ज माफिकडे लक्ष न ठेवता बँकेच्या घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास बँका नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या गटांना स्वताहून कर्ज वाढून देते त्यामुळे बचत गटाचा फायदा होऊ शकतो.इको बँकेच्या शाखा व्यवस्थापक श्रीमती स्मिता बदक यांनी गटातील महिलेने घेतलेल्या कर्जातून स्वतः व्यवसाय करावा व यातून परतफेड करावी कर्ज परतफेडीचा  भार घरातील पुरुषावर टाकू नये यातून स्वालंबी होण्याचा प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले. बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक श्री.राजीव सिंग यांनी गटांने नयमित कर्ज परतफेड करणाऱ्या गटास 10 लाख रु पर्यंत बँक कर्ज देऊ शकते असे सांगीतले.  
       या कार्यक्रमात विविध बँकांनी गटांना धनादेश देऊन कर्ज वाटप करण्यात आले.व RSETE मार्फत IIBF परीक्षा उतीर्ण झालेल्या BC सखी यांना  प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. व जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापक यांनी उस्पुर्त  सहभाग दिला व यासाठी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शशिकांत सावंत व अभीयानाचे अधिकारी कर्मचारी  यांनी सर्व बँकेचा पाठपुरावा करून कर्ज वाटप करण्याबाबत चांगली भूमिका घेतली. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री जे.व्ही.मोडके, लेखा अधिकारी श्री मनोज पिनगाळे,जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशान राजू दांडगे,जिल्हा व्यवस्थापक MIS विक्रम सारस्वत,जिल्हा व्यवस्थापक KM किरण गुरमे,तालुका अभियान व्यवस्थापक श्री मिलिंद कुकडे,तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित,रमेश पवार,तानाजी काळे, संतोष भोसकर,उज्वला गायकवाड, प्रभाग समन्वयक संतोष बोडखे,दिनकर तपाशे,गजानन लोखंडे,अरविंद धाबे ,दैवशाला चाटशे, विष्णु जांबूतकर,व  RSETIच्या,जैस्वाल मैडम, यांनी परिश्रम घेतले.
       सदर मेळाव्यामध्ये आर्थिक समावेशान च्या अनुसरून उत्कृष्ट काम केल्याबाबत जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन तथा तालुका अभियान व्यवस्थापक हिंगोली  श्री राजु दांडगे व तालुका व्यवस्थापक पंडित व बँक सखी यांचा  प्रकल्प संचालक निलेश कानवडे यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला .

Post a Comment

أحدث أقدم