कष्टकरी शेतमजूर महिलांचा गोदावरी अर्बन हिंगोली शाखेच्या वतीने सन्मान------------------------------------

कष्टकरी शेतमजूर महिलांचा गोदावरी अर्बन हिंगोली शाखेच्या वतीने सन्मान
-----------------------------------------

हिंगोली - विविध क्षेत्रात मान- सन्मानाची पदे भूषविलेल्या महिलांचा गौरव नेहमीच होत असतो,  परंतु ज्यांच्यावर देशाची अन्नसुरक्षा अवलंबून आहे अशा ग्रामीण भागातील ८० टक्के कष्टकरी शेत मजूर महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने "आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिना"चे औचित्य साधून लोहगाव ता.हिंगोली परिसरात दि.१९ रोजी गोदावरी अर्बनच्या माध्यमातून शेतात कष्टाची कामे करीत असलेल्या महिलांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना सनकोट देऊन सन्मान करण्यात आला.

      जगभरात १५ ऑक्टोंबर रोजी "आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन" साजरा केला जातो. यंदा या दिनाचे औचित्य साधून गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी शेतमजूर महिलांना सनकोट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.  
     दरम्यान संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पाचही राज्यातील सर्व शाखांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनाखाली कष्टकरी महिलांचा गृहसन्मान उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
      यावेळी लोहगाव येथील कष्टकरी महिला शेतकरी कमलबाई सोनुने, सावित्रीबाई घंदारे, पंचफुलाबाई साबळे,  फातेमा हुसेन पठाण, हलीमा रशीद पठाण,  गोदावरी अर्बन हिंगोली शाखेचे हिंगोली जिल्हा व्यवसाय विकास व्यवस्थापक प्रदीप देशपांडे, शाखा व्यवस्थापक अंकुश बिबेकर, रंजना हरणे, जयवंत देशमुख, विशाल नाईक, रक्षंदा मुक्कीरवार, ममता ओझा, प्रविण पाईकराव, शुभम टवले यांची  उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم