हिंगोलीत ईद-ए-मिलाद साजरी

हिंगोली: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ईद-ए-मिलादुन्नबी सल्ललाहु अलैहु सल्लम निमित्त दिनांक 19/10/2021 रोजी कार्यक्रम आयोजीत केला होता परंतु कोरोना काळ असल्याने शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करुन जसे की, मास, सेनिटायझर, सामाजिक अंतर व ईतर शासनाच्या आदेशाचे पालन करुन सदरील कार्यक्रम हा साध्या पध्दतीने दि. 19/10/2021 रोजी वार मंगळवार, सकाळी 10.00 वा. ते 11.00 वाजेच्या दरम्यान उत्साहात साध्या पध्दतीने पार पडला आहे.


सदरील कार्यक्रमामध्ये परचम कुशाही (झेंडी) दाखवुन कुराण पठण, फातेयाखानी सलातोसलाम, रजा मैदान लंगर वाटप (महाप्रसाद) व देशातील नागरिकांच्या सुख समृध्दीसाठी व कोरोना देशातुन व जगातुन नाहिसा होण्यासाठी दुवा (प्रार्थना) शांततामय पध्दतीने पार पाडण्यात आला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व उलमाये अहेले सुन्नत वल जमात, ईद-ए-मिलादुन्नबी समितीचे अध्यक्ष हाजी मो. खिजर रजवी, सचिव अहेमदखों रजवी, कोषाध्यक्ष नसीरखों, शेख गुलाम मुस्तफा, शेख जावेद, शेख सिराज, शेख शाहरुख, अब्दुल कदीर रजवी, कलीम खॉन, अब्दुल गफुर, गफार मामु शेख अजिज सय्यद इमरान, बाबर रजा, अब्दुल हकिम, चाँद खॉन रजवी, सज्जाद खॉन, फारुख अजमेरी, शेख रशिद तांबोळी, गैबु पहेलवान, शाहि खॉन व ईतर समितीचे सदस्य उपस्थिती होते.

Post a Comment

أحدث أقدم