तलाठी संघाने शेतकरी व जनतेचा विचार करून कामबंद आंदोलन स्थगित केले परंतु श्री जगताप यांची बदली त्वरित करण्यासाठी राज्य तलाठी संघाची आग्रही मागणी..!!

तलाठी संघाने शेतकरी व जनतेचा विचार करून कामबंद आंदोलन स्थगित केले परंतु श्री जगताप यांची बदली त्वरित करण्यासाठी राज्य तलाठी संघाची आग्रही मागणी..!! 

अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा राज्य तलाठी संघाचा इशारा..!!

मुंबई:- महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिनांक १३.१०.२०२१ पासून सर्व कामावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केलेले होते तथापि मा.ना.श्री. बाळासाहेब
थोरात साहेब, मंत्री, महसूल यांचे समवेत दिनांक २३.१०.२०२१ व मा.डॉ.श्री.नितीन करीर साहेब, अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ यांचे समवेत दिनांक २२.१०.२०२१ रोजी झालेल्या चर्चेनुसार व महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची कार्यकारणीची दिनांक २४.१०.२०२१ रोजी पुणे येथे
झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार दिनांक १३.१०.२०२१ पासून सुरु झालेले काम बंदआंदोलनास तुर्तास स्थगित करण्यात आलेले आहे. तथापि संदर्भीय दिनांकास झालेल्या चर्चेनुसार श्री. जगताप यांची बदली १५ दिवसात करणेत यावी.
अन्यथा स्थगित केलेले आंदोलन राज्य तलाठी संघाच्या आदेशाने पुन्हा सुरु करण्यात येणार आहे असे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष सय्यद अयुब स रसूल यानी सांगितले

Post a Comment

أحدث أقدم