नोकरी हा आयुष्यातील पार्ट होता अन तो देखील सोडला मात्र समाजकारणात झोकून देणार- रामदास पाटील

नोकरी हा आयुष्यातील पार्ट होता अन तो देखील सोडला मात्र समाजकारणात झोकून देणार- रामदास पाटील

हिंगोली/- ( प्रतिनिधी )
जीवनामध्ये नोकरी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो ती मिळविण्यासाठी आतोनात प्रयत्न करावे लागतात आणि ती मोठ्या जिद्दीने मिळवली देखील होती मात्र नोकरी मिळाल्यानंतर त्या खुर्चीत बसल्या नंतर जेवढा काही न्याय देता आला. आज मात्र केवळ समाजकारणासाठी मोठ्या कष्टाने कमावलेल्या नोकरीचा राजीनामा दिला असल्याचे रामदास पाटील यांनी पत्रकारांशी सवांद साधताना सांगितले. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात रामदास पाटील यांना निरोप व भावी कामगिरी साठी शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. रामदास पाटील यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला. पाटील यांचा राजीनामा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.
रामदास पाटील यांनी मंगळवार दि. 26 आॅक्टोबर रोजी हिंगोली येथे पत्रकारांशी सवांद साधला. त्यांनी नोकरी करीत असताना आलेले अनुभव सांगितले, मात्र हिंगोली या शहराने खूप काही शिकविल्याचे सांगितले. कोणत्याही अधिकाऱ्यांनी पालिकेत जॉईन झाल्यानंतर एक ते दोन प्रोजेक्ट केलेच पाहिजेत, अन ते मी राबवल्यामुळेच मला परत साडेचार वर्ष हिंगोलीत काम करता आले. चार वर्षाच्या कालावधीत एक ही सुट्टी घेतली नाही. काम करीत असताना, चुका होत असतात, अन पत्रकार त्या चुका शोधत असतात, मात्र त्याचा बाऊ न करता त्या चुकातून काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि त्यातून शहराचा विकास होण्यास मदत मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले.मराठवाड्यातील नवीन जिल्हा हिंगोली आहे. मराठवाड्यातील नवीन जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये काम करण्यासाठी फार मोठी संधी मिळाली अन त्या संधीचे सोने देखील करता आलं सर्वांच्या सहकार्याने या हिंगोली शहराचा विकास करता आला असल्याचे पाटील यांनी सांगितले असे ही आम्ही अधिकारी म्हणजे शासकीय नोकर आहोत, महिन्याला शासन वेतन देत असत, त्यातूनच लोकउपयोगी कामे करावी लागतात.। नोकरीच्या काळामध्ये सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल रामदास पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी पत्रकार बांधवांनी रामदास पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाची प्रतिमा रामदास पाटील यांना भेट देऊन सत्कार केला. यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم