हिंगोलीत व्यापाराच्या सतर्कतेमुळे चोरटी महिला पोलिसांच्या जाळ्यात

हिंगोलीत व्यापाराच्या सतर्कतेमुळे चोरटी महिला पोलिसांच्या जाळ्यात 


पुन्हा आली होती त्या दुकानात 
 दुसऱ्यांदा चोरीच्या उद्देशाने 


हिंगोली- येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी सुधीर आप्पा सराफ यांच्या ज्वेलर्स मधून ज्वेलर्स मधून 17 ऑक्टोबर रोजी एका महिलेने हातचलाखीने 75 हजार रुपयांचे गंठण लंपास केले होते. हीच महिला आज 26 ऑक्टोबर रोजी पुन्हा दुकानात खरेदीसाठी आल्याचे लक्षात येताच सराफ व त्यांच्या कर्मचाऱ्याने पोलिसांना कळवून सदर महिलेला गजाआड केले आहे.
 हिंगोली शहरातील प्रसिद्ध इरान्नाअप्पा सराफ ज्वेलर्स मधून 17 ऑक्टोबर रोजी बुरखाधारी महिलेने हातचलाखी करून दुकानातून 75 हजार रुपयांचे गंठण लंपास केले होते. याप्रकरणी दुकान मालक सुधीर आप्पा सराफ यांनी शहर पोलिसात तक्रार देखील दिली होती. त्यानंतर आज 26 सप्टेंबर रोजी तीच महिला सकाळी नऊच्या सुमारास दुकानात खरेदीसाठी आली. यावेळी सराफ व त्यांच्या कर्मचाऱ्याने सदर महिलेस ओळखले. महिलेने विविध दागिने बघण्याचा बहाणा करीत पुन्हा एकदा काळी पोत असलेला दागिना लंपास केला.
तोपर्यंत हिंगोली पोलिसांना कल्पना देण्यात आल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी दुकानात येऊन सदर महिलेला रंगेहाथ पकडले. सराफा व्यापारी सुधीर आप्पा सराफ व त्यांच्या कर्मचाऱ्यांमुळे सदर महिला गजाआड झाली. यापूर्वी देखील या महिलेने अशा पद्धतीचे अनेक गुन्हे केले असून ती अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या महिलेची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर  यांनी  सांगितले 

Post a Comment

أحدث أقدم