हद्दपार इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले

*हद्दपार इसमास स्थानिक गुन्हे शाखेने पकडले*
हिंगोली प्रतिनिधी
4 नोव्हेंबर 2021
 
गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे गुन्हेगारी टोळ्यावर पोलीस अधीक्षक यांना एक टोळी किंवा अनेक टोळ्यांना  दोन वर्षापर्यंत जिल्ह्यातून किंवा इतर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे अधिकार आहेत. त्या  अधिकारान्वये  जिल्हा पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे इसम नामे संजय पंडित काळे राहणार लिंबाळा यास ऑगस्ट 2021 मध्ये हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.
आज दिनांक 4/ 11 /2021रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना हद्दपार इसम नामे संजय पंडित काळे हा लिंबाळा येथे मिळून आल्याने त्यास   विचारपूस केली असता त्याने माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे हद्दपारीचे आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत आल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक घेवारे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाण संजय पंडित काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर यांनी यापूर्वी अकोला येथे सुद्धा पोलीस अधीक्षक असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जात होते. अकोला येथे सुद्धा कलासागर साहेबांनी अनेक गुन्हेगारावर हद्दपारीचे केसेस करून गुन्हेगारांना सळो कि पळो करून गुन्हेगारी नियंत्रणात आणली होती. हिंगोली मध्ये सुद्धा अनेक टोळ्या हद्दपार केलेल्या असून भविष्यात सुद्धा कायदा  व सूव्यवस्था तसेच  सार्वजनिक शांतता बिघडवणारे ,गुन्हे करणारे लोकांवर हद्दपार करणार असल्याचे सांगितले. एकंदरीतच हिंगोलीतील गुन्हेगारांनी हद्दपारीची चांगलीच धस्की घेतल्याचे दिसत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे, सहा. पोलिस अधीक्षक श्री यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार प्रेम चव्हाण, राठोड ,शंकर जाधव, शेख जावेद, विठ्ठल काळे , आकाश टापरे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

أحدث أقدم