पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
पोतरा गावावर शोककळा
महाराष्ट्र 24 न्यूज
हिंगोली- दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच शेतातला गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी आपल्याला सोडून गेल्याने हादरून गेलेल्या पतीने देखील दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडलीय.
काजल सोनू उर्फ भीमराव घोगरे(२०) सोनू उर्फ भीमराव रामा घोगरे (२२) अशी मयताची नावे आहेत. काजल आणि सोनू चे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते ते नेहमीच एकाच ताटामध्ये जेवण करत असत अजिबात एकमेकाला सोडून राहत नसत परंतु दिवाळी सणानिमित्त माहेरी जाण्यासाठी पत्नीला पतीने विरोध केल्यानंतर पत्नीला राग सहन झाला नाही तिने थेट घरातच छताला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने पती सोनू उर्फ भीमराव हा चांगलाच हादरून गेला, अन त्याने देखील शेतशिवारात आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले
पोतरा गावावर शोककळा पसरली आहे
إرسال تعليق