ट्रक खासगी बसमध्ये अपघात चार जण जागीच ठार तर 22 जखमी पाच जणांची प्रकृती गंभीर

ट्रक खासगी बसमध्ये अपघात  चार जण जागीच ठार तर 22 जखमी 

ट्रकने दिली बसला जोरदार धडक, प्रवासी समोरच्या काचेतून थेट बाहेर
हिंगीली जिल्ह्यातील 
 कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर पार्डी मोड शिवारात खाजगी बस व ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये झाल्याने 4 जण जागीच ठार झाले आहेत, तर 22 जण जखमी झाले आहेत. तसेच, पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आहे. ट्रक उलटल्यामुळे खाली दबलेले मृतदेह जेसीबीद्वारे बाहेर काढण्यात आले आहेत.
या भीषण अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक विस्कळीत झाली होती. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथ‌ून प्रवाशी घेऊन खाजगी बस (क्रमांक एमएच 38-एफ-8485) हिंगोलीकडे येत होती. दरम्यान, पार्डी मोड शिवारात भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने ( क्रमांक आरजे 02 जीबी 3945) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बसला धडक दिली.  त्यामुळे भीषण अपघाताने बसमधील प्रवाशी चालकसमोरील काचा फुटून बाहेर फेकले गेले होते. या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत.
मृतांमध्ये राजाप्पा दगडीराम अजरसोंडकर (वय 48), त्रिवेणी राजाप्पा आजरसोंडकर (वय 45) रा. आजरसोंडा ता. औंढा नागनाथ, विठ्ठल कणकापुरे (वय 60) रा. ब्राम्हणगाव ता. उमरखेड, पंचफृला विठ्ठल गजभार (वय 70) रा. बाभळी ता. कळमनुरी यांचा समोवश आहे. तसेच,  22 जण जखमी झाले आहेत. यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तातडीने नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
जखमीमध्ये गजानन व्यवहारे (वय 51) रा. कळमनुरी, स.माबुद स.अमिन (वय 53), शैख खैरात शेख सत्तार (वय 55), मो. रफीक मो. लतीफ (वय 45), कुंडलिक रामराव नागरे (वय 43), शेख हबीब शेख महेबुब बागवान (वय 50), सुभाष पौळ (वय 40), नंदा काळे (वय 50) सर्व रा. हिंगोली, दिगंबर नारायण बहादुरे (वय 60), रा. पिंपरी ता. कळमनुरी, बाबुराव ग्यानुजीराव मोरे (वय 50) रा. वारंगाफाटा ता. कळमनुरी, सुनंदा मनोहर इंगोले (वय 47) रा. नेरली ता. नांदेड, इकबाल खान बशीर खान (वय 29) रा. अलगर राजस्थान, गौतम सखाराम डोगर (वय 50) रा. डोंगरकडा ता.कळमनुरी, खैसर बेगम काजी अल्लाउददीन (वय 60), स. अकमल स. कलीम (वय 8), साकियाबेगम स. तसलीम (वय 60) तिघे रा. अर्धापुर जि.नांदेड, शेख आरेफ शेख खाजामिया (वय 60), शेख खाजामिया शेख अब्दुल (वय 70) रा. लाखमेथा ता. औंढा नागनाथ, रामप्रसाद माणिकराव गडदे (वय 26), सुमित्रा रामप्रसाद गडदे (वय 22), दोघे रा. तांदुळवाडी ता. सेनगाव, वरद दत्तराव शिंदे (वय 21) रा. सेनगाव, विठ्ठल श्रावण गजभार (वय 60), भाग्यश्री विठठल गजभार (वय 30) रा. बाभळी ता. कळमनुरी यांचा समावेश आहे. जखमीवर कळमनुरी व आखाडा हिंगोली येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपपोलीस निरीक्षक बालाजी पुंड, तसेच कळमनुरी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते
अपघातामुळे  जिल्हाभरात शोककळा पसरली आहे

Post a Comment

أحدث أقدم