*खून प्रकरणातील ७ आरोपींची निर्दोष मुक्तता; हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल*
हिंगोली प्रतिनिधी
दि.10/12/2021 रोजी हिंगोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.पि.व्हि.बुलबुले यांनी
07 आरोपींची खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
मौजे दाताडा बु. तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील फिर्यादीने पोलीस स्टेशन सेनगाव येथे दिनांक 10/11/2018 रोजी फिर्याद दिली होती
दिनांक 9/11/2018 रोजी संध्याकाळी सात वाजता सुमारास दाताडा बुद्रुक येथील मारुती मंदिराच्या जवळ आरोपी सचिन सुरनर यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांशी शिवीगाळ केली व विवाहाने मुलगी का देत नाही याकरिता फिर्यादीच्या वडीलासोबत वाद घातला. त्यानंतर सचिन सुरनर व किरण सुरनर यांनी फिर्यादीच्या वडिलांना गुप्तीने पोटात मारले नितिनने काठीने डोक्यात मारले तसेच इतर आरोपी नितीन कवडे, गणेश कवडे,नामदेव कवडे,विश्वनाथ कवडे,अमोल शिंदे,संकेत मस्के यांनी देखील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दिली यामध्ये फिर्यादीचे वडील श्री कैलास शिंदे हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जागेवरच मृत्युमुखी पडले होते. सदरच्या घटनेनंतर फिर्यादी अमोल पि.कैलास शिंदे यांनी पोलिस स्टेशन सेनगाव येथे फिर्याद दिल्यावरून आरोपी विरुद्ध गु.र.क. 302,307,143,147,148,149 अन्वये गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरणाचा सरकार पक्षातर्फे एकूण 09 साक्षीदार तपासण्यात आले त्यांच्या साक्ष पुराव्यातील विसंगतीचा विचार करून मा.न्यायालयाने सर्व 07 आरोपींची खूनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली सदरच्या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड.पि.के पुरी यांनी काम पाहिले व त्यांना ॲड.पि.यु.कऱ्हाळे,ॲड.के.एम.गिरी,ॲड.ऐ.ओ.साठे,ॲड.अमित कळासरे,ॲड.ए.ए.वानखेडे, ॲड.ए.जि.पुरी यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق