हिंगोली बलात्कार प्रकरणाला नवे वळण; पतीवरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी
हिंगोली : पतीनेच पत्नीवर बलात्कार करण्यासाठी मित्राला मदत केल्याच्या प्रकरणातून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात 20 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती व अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. आता मात्र या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पीडित महिलेचे व तिच्या प्रियकराचे गेल्या वर्षभरापासून संबंध असून पती विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात आले आहे.
हिंगोली तालुक्यातील सवड येथे 19 जानेवारी रोजी एका महिलेने आरोपी माधव जोगदंड याने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. व यासाठी पती संजय थोरात यांनी जोगदंड यास मदत केली, अशी फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर महिलेच्या पतीसह जोगदंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, 24 जानेवारी रोजी ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की 19 जानेवारी रोजी संबंधित महिलेचा पती संजय थोरात हा पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. याच दरम्यान रात्री 10 ते 11 च्या सुमारास संबंधित महिलेने तिचा प्रियकर माधव जोगदंड यास घरी बोलावून हिंगोली बलात्कार प्रकरणाला नवे वळण; पतीवरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी
. दरम्यान, पीडित महिला व माधव जोगदंड घरात असल्याची बाब गावकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांच्या घरासमोर मोठा जमाव जमला होता. त्यानंतर संजय थोरात हे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने घरी आले असता, त्यांनी हा सर्व प्रकार बघितला. महिला व जोगदंड यांचे गेल्या वर्षभरापासून संबंध असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर महिलेने बदनामीपोटी पती संजय थोरात व तिच्या प्रियकराविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संजय थोरात यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटा असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, अनुसया बोरकर, सविता राउत, विलास थोरात, शिवाजी थोरात, माधव थोरात, केशव कुबडे, नामदेव पडोळे, विकास जोजार, केशव जोजार, गजानन डांगे, नागोराव कोल्हापुरे, केदारलिंग जोजार, केदार बेरडे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी मोठया संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते.
हिंगोली : पतीनेच पत्नीवर बलात्कार करण्यासाठी मित्राला मदत केल्याच्या प्रकरणातून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात 20 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती व अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. आता मात्र या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पीडित महिलेचे व तिच्या प्रियकराचे गेल्या वर्षभरापासून संबंध असून पती विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात आले आहे.
हिंगोली तालुक्यातील सवड येथे 19 जानेवारी रोजी एका महिलेने आरोपी माधव जोगदंड याने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. व यासाठी पती संजय थोरात यांनी जोगदंड यास मदत केली, अशी फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर महिलेच्या पतीसह जोगदंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, 24 जानेवारी रोजी ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की 19 जानेवारी रोजी संबंधित महिलेचा पती संजय थोरात हा पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. याच दरम्यान रात्री 10 ते 11 च्या सुमारास संबंधित महिलेने तिचा प्रियकर माधव जोगदंड यास घरी बोलावून घेतले. दरम्यान, पीडित महिला व माधव जोगदंड घरात असल्याची बाब गावकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांच्या घरासमोर मोठा जमाव जमला होता. त्यानंतर संजय थोरात हे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने घरी आले असता, त्यांनी हा सर्व प्रकार बघितला. महिला व जोगदंड यांचे गेल्या वर्षभरापासून संबंध असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर महिलेने बदनामीपोटी पती संजय थोरात व तिच्या प्रियकराविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

إرسال تعليق