वीरमातेस जमीन मिळवून देण्यास एस. के .मिनगिरे, सहायक आयुक्त, समाजकल्याण हिंगोली यांच्या प्रयत्नांना यश :
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील बी एस .एफ .चे जवान कविचंद परसराम भालेराव हे काश्मीर येथे सण 2002 मध्ये शाहिद झाले होते त्यांचे कुटुंब भूमिहीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक न्यायविभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत शाहिद जवान कविचंद भालेराव यांच्या मातेस उदरनिर्वाह करण्याकरिता चार एकर जमीन उपलब्ध करून देण्याचे ठरले त्यासाठी स्वर्गीय खासदार राजीवजी सातव यांनी शासनाकडे पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून डीआरडीए व वयाची अट शिथल करून घेतली. त्यानूसार चार ते पाच वर्षांपासून जमिनीचा शोध घेणे सुरु होते मात्र शासकीय दरामध्ये जमीन उपलब्ध होत नव्हती म्हणून सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी स्वतः लक्ष घालून तेथील काही सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन वीरमातेला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास एक वर्षांपासून प्रयत्न केले अखेरीस त्यांच्या या प्रयत्नास यश आले व त्यांनी 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताकदिनी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा .वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते या विरमातेचा शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना मा .पालकमंत्री यांनी सामाजिक न्यायविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेचे कौतुक केले .या योजनेमुळे एखाद्या भूमिहीन कुटुंबाला कायमचे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होते शाहिद कविचंद भालेराव यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सक्षम बनवणे हे माझे कर्तव्य समजते व वीरमातेस आज चार एकर जमीन शासनाकडून देताना शाहिद जेवणास खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे वाटते .या मध्ये जिल्हाधीकारी तसेच सामाजिक न्यायविभाग हिंगोली यांनी या कमी तत्परता दाखवून जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचेही या वेळी अभिनंदन करते .
إرسال تعليق