मा . वर्षा गायकवाड , पालकमंत्री हिंगोली यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाचे "VISION DOCUMENTS " या पुस्तकाचे प्रजासत्ताक दिनी प्रकाशन

मा . वर्षा गायकवाड , पालकमंत्री हिंगोली यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाचे "VISION DOCUMENTS " या पुस्तकाचे प्रजासत्ताक दिनी प्रकाशन :

हिंगोली जिल्हयाचा सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांचा विशेषत: मागास व दीन दुबळया घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत राबविल्या जाणा-या योजना त्यांच्यापर्यंत पोहचणे अत्यंत गरजेचे असल्याने समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेची माहिती  “ व्हिजन डॉक्युमेंट ”  या  माहिती पुस्तिकेव्दारे सुलभ करुन प्रकाशित करण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.  त्याव्दारे सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाचा उपक्रम हिंगोली जिल्हयातील दुर्बल व मागास घटकांच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणा-या विविध योजनांची सविस्तर माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत जाणार आहे.  
“ व्हिजन डॉक्युमेंट ” या पुस्तिकेत हिंगोली जिल्हयातील संपुर्ण मतदारसंघ, नगर परिषद, नगर पंचायत, तालुके, पंचायत समिती, ग्रामपंचायत व गावे, जिल्हयाचे क्षेत्रफळ, जिल्हयाची एकूण लोकसंख्या व एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अनु.जातीची लोकसंख्या व त्याचे प्रमाण, स्त्री-पुरुष लोकसंख्या, तालुका निहाय अनु. जाती प्रवर्गाची लोकसंख्या व टक्केवारी, जिल्हयातील ऐतिहासिक स्थळे व माहिती, जिल्हयाचे भौगोलिक महत्व, जिल्हयातील वनस्पती व प्राणी, पिक पध्दती व महत्वाची पिके, जलसिंचन विविध प्रकल्प व्यवस्था, त्यात लाभक्षेत्र व ओलीता खालील क्षेत्र, वाहतूक व्यवस्था, औद्योगिकरण, शहरीकरण, शैक्षणिक सुविधा, जिल्हयातील महाविद्यालयाची संख्या, वैद्यकिय सुविधा, एकूण साक्षरतेचे प्रमाण, त्यापैकी अनुसूचित जाती साक्षरता प्रमाण, रोजगार व बेरोजगार संस्थाची संख्या, रोजगार व बेरोजगाराचे प्रमाण, जिल्हयातील नवउद्योजकासाठी प्रशिक्षणाचा तपशिल, जिल्हयातील दुकाने, व्यापारी संस्था व त्यातील कामगारबाबतची माहिती, अनु. जातीतील प्रमुख जाती, ग्रामीण व शहरी अनु. जातीच्या वस्त्यांची संख्या, अनु. जाती वस्त्यांमधी सोयी-सुविधा, हिंगोली जिल्हयातील सामाजिक न्याय विभागाची सद्यस्थिती, संवेदनशील / अतिसंवेदनशील गावांची माहिती, जिल्हयातील नगर पालिका / नगर पंचायत निहाय आरक्षित प्रभाग, दिव्यांग व्यक्तींची संख्या इत्यादी सांख्यिकी माहिती अद्यावत करण्यात आलेली असून हिंगोली जिल्हयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना प्रत्यक्ष अंमलबजावणी करतेवेळी असलेली प्रमुख आव्हाने स्विकारुन त्यामध्ये भविष्यात कोणकोणत्या सोयी-सुविधा प्रथम प्राध्यान्याने उपलब्ध करुन द्यावयाच्या आहेत त्या नमुद करण्यात आलेल्या आहेत.
उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने, पुढील वाटचाल करतांना प्रथम प्राध्यान्य देण्यात आलेली ध्येय व उद्दिष्टे पुर्ण करणेसाठी आखण्यात आलेला कृती आराखडा शासन व प्रशासनाच्या सहकार्याने पुढील 25 वर्षात पुर्ण करण्याचा मानस आहे.
  

Post a Comment

أحدث أقدم