जिल्हयातुन अटल सात गुन्हेगाराना तडीपार
तीन आरोपीला सहा महिन्यासाठी व चार आरोपींना एक वर्षासाठी हद्दपार
हिंगोली (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान, मोठ्या चोर्या करणार्या सात अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केल्याचे शनिवार दि.८ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले.
दरम्यान, कळमनुरी येथील शेख जावेद उर्फ डडोला शेख अब्दुल्ला, मिलिंद लोखंडे, नागेश उत्तम गवळी तर हिंगोली पोलीस ठाणे अंतर्गत विशाल सुरेश सांगळे, शंकर नारायण सांगळे, मंगल पांडुरंग काळे तर विलास उर्फ ईल्या भागोजी चेके, या सात अट्टल गुन्हेगारांना यातील एक ते तीन यांना दि.३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यातील क्रमांक चार ते सात अट्टल गुन्हेगारांना उपविभागीय अधिकारी यांनी दि.३१ डिसेंबर रोजी या चार आरोपीना एक वर्षकरिता तडीपार केले आहे.
याप्रकरणी आणखी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देविदास लालजी आडे राहणार भाटेगाव या गुन्हेगाराला नेहमीच हातभट्टी काढून विकतोस म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या कडून एक वर्षकरिता परभणी कारागृहात दाखल केले. अशी माहिती देत असताना शहरातील दोन दिवसापूर्वीच झालेल्या चोर्या दुकान फोडणे, घर चोरी यातील गुन्हेगाराबाबत प्रश्न विचारला असता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी घडलेल्या गुन्ह्याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आदींची उपस्थिती होती.
إرسال تعليق