डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ऑनलाईन होणार-डॉ.प्रा.सुखदेव बलखंडे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला ऑनलाईन होणार-डॉ.प्रा.सुखदेव बलखंडे
हिंगोली (प्रतिनिधी)- 
शहरातील बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.शत्रुघ्न जाधव यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी काही नियम व अटी घातलेल्या आहेत. त्याचे पालन व्हावे यासाठी या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमाला दरवर्षी १७ जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत घेण्यात येते. मागील ३४ वर्षापासून ही व्याख्यानमाला मंडळाच्या वतीने व समाजाच्या लोकवर्गणीतून घेण्यात येते. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील थोर विचारवंत, लेखक, साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विचारवंत यांना पाचरण केले जाते. डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. रावसाहेब कसबे, प्रा.प्र.ई.सोनकांबळे, प्रा.अरूण कांबळे, प्रा.डॉ. भाऊ लोखंडे, प्रा.पी.एस.चंगोले, प्रा.हरी नरके, प्रा.रुपा कुलकर्णी बोधी, राजरत्न आंबेडकर, ऍड.सुरेश माने अशा अनेक मान्यवर वक्त्‌यांनी आपले विचार या व्याख्यानमालेतून व्यक्त केलेले आहेत. यावर्षी दि.१७ ते २० जानेवारी २०२२ रोजी होणार्‍या व्याख्यानमालेची पूर्ण तयारी होत असून व्याख्यानाचे विषय व व्याख्या त्यांची नावे लवकरच निश्चित करण्यात येतील असे मंडळाचे सचिव प्रा. डॉ.सुखदेव बलखंडे यांनी सांगितले. बैठकीत कैलास भुजंगळे, भीसे साहेब भीमराव कुरवाडे, डॉ.सचिन हटकर, युवराज खंदारे, मिलिंद इंगळे, आर.बी.वाढे, ढाले, जितेंद्र भालेराव, सरकटे, वाकळे, गंगाधर पाईकराव, प्रवीण रुईकर, बबन दांडेकर, विश्वनाथ लोनकर, अंतीदास इंगोले, रमेश खंदारे, रामा वाकळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم