हिंगोलीत १ लाख २९ हजार बालकांना पाजला जाणार रविवारी पोलिओ डोस

हिंगोलीत १ लाख २९ हजार बालकांना पाजला जाणार रविवारी पोलिओ डोस 


हिंगोली,-  जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने  रविवारी २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ

 मोहीम राबविली जाणार आहे

त्यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून  ०ते ५ वर्ष वयोगटातील एक लाख २९हजार ७५३ बालकांना पोलिओ डोस पाजला जाणार असल्याचे  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . शिवाजी पवार यांनी सांगितले.

पोलिओ अभियान २२ जानेवारी रोजी घेण्यात येणार होते, मात्र कोरोना प्रादुर्भाव व ओमीक्रोन व्हेरियंटचे प्रमाण वाढल्याने हा कार्यक्रम तूर्तास रद्द करून पुढे ढकलण्यात आला ,त्यानुसार आता रविवारी प्लस पोलिओ अभियान राबविण्यात येणार असल्याने आरोग्य विभागाकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी शहरी, ग्रामीण मिळून एकूण १ हजार १७५ केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी तीन हजार १२८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 दरम्यान, बसस्टॅन्ड , रेल्वेस्टेशन , नवीन बांधकाम साईट रस्त्याशेजारील पाले , विटभट्टया आदी ठिकाणी पोलीओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . शनिवारी एक दिवस अगोदर   सर्व शाळा प्रभात फेरी काढुन पोलीओ मोहिमेस सहकार्य करणार आहेत.  मोहिमेसाठी मंदीर व मस्जीद वरुन माईकव्दारे आवाहन करण्यात येत आहे , सर्व पाच वर्षाखालील बालकांना पोलचिट वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


पोलिओ अभियान राबविण्यासाठी  ६१ वैद्यकीय अधिकारी ,६२ पर्यवेक्षक, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ट्रान्झिट टीम मध्ये ३८ कर्मचारी तर मोबाईल टीम मध्ये ८० कर्मचारी राहणार आहेत. यासाठी १हजार ४२४ थर्मल व्हायल बॉक्स ची व्यवस्था केली आहे. प्लस पोलिओ अभियान मोहिमेची आरोग्य अभियानाने जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी कर्मचारी कामाला लागले आहेत.


आरोग्य विभागाची तयारी सुरू


रविवारी (२७) फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात प्लस पोलिओ अभियान मोहीम राबविण्यात येणार असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने बॅनर ,पोस्टर प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केले जात आहे. अधिकाधिक प्रसिद्धी व्हावी यासाठी आरोग्य विभागाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم