ऑनलाईन ॲपवरून लोन (कर्ज)
घेत असाल तर सावधान
हिंगोली सायबर सेलतर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
हिंगोली - आजकाल फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत, गुन्हेगार कोणत्याना कोणत्या कारणावरून नागरिकांना अडकविण्याचे प्रकार अनेकदा घडले असताना आता सायबर गुन्हेगार ऑनलाइन लोन आप वरून नागरिकांना गंडा घालण्याचा नवीन प्रकार सुरू असून वेळीच नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन हिंगोली सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगार आपल्या मोबाईलवर लिंक पाठवून तातडीने लोन देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर इन्स्टंट लोन घेण्यासाठी मोबाईल मध्ये लोन अप डाऊनलोड करायला सांगतात.त्यानंतर काही माहिती मागितली जाते. त्यास आपण भूलथापांना बळी पडून फोन मधील कॉन्टॅकट, कॅमेरा माहिती, लोकेशन, स्टोरेज आदी माहिती दिली जाते. परमिशन अलोव केल्यास सायबर गुन्हेगाराकडून मोबाईल मधून संपूर्ण डेटा चोरला जातो, त्यामुळे अलोव करताना काळजीपूर्वक विचार करून अलोव करावे. तसेच लोन मिळवण्यासाठी आपल्याकडून आधारकार्ड, पॅन कार्ड, अकौंट नंबर मागविले जातात. व त्यानंतर लोनची रक्कम आपल्या खात्यात टाकली जाते.
पुन्हा दोन तीन दिवसानंतर सायबर गुन्हेगार लोनची परतफेड म्हणून आपण कर्ज घेतलेल्या रकमेच्या दुप्पट, तिप्पट रकमेची मागणी केली जाते.ती रक्कम परतफेड न केल्यास गुन्हेगारकडून आपल्याला अश्लील संदेश पाठवून शिवीगाळ व धमकी दिली जाते. तसेच आपल्या कॉन्टॅक्त लिस्ट मधील नातेवाईक किंवा मित्रांना बदनामी होईल असे फोटो टाकूनमानसिक त्रास दिला जातो. त्यामुळे अश्या कोणत्याही प्रकारच्या इन्स्टंट एपला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन सायबर सेलच्या वतीने करण्यात आले. फसवणूक झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असेही सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती बी. एच. कांबळे यांनी सांगितले आहे.
إرسال تعليق