हिजाब ही काळाची गरज आहे -- खलील बेलदार

हिजाब ही काळाची गरज आहे -- खलील बेलदार
----------------------------------------------
आपण एकविसाव्या शतकाकडे जात असताना स्त्रियांना पूर्णपणे संरक्षण मिळत नसल्याने वेगवेगळ्या घटना घडत आहेत. जगातील सर्व स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. तरीही परंतु देशातील व जगातील विविध घटनेत स्त्री अत्याचारांच्या घटनांना बघता, स्त्रियांचे संरक्षण व्हावे याकरिता आणि संस्कृती आणि सभ्यता यादृष्टीकोणतून स्त्रियांनां हिजाब असणे काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख खलील बेलदार यांनी एका प्रसिद्धीपत्रकात दिली.
               स्त्रियांना निसर्गानेच दुय्यम दर्जा दिलेला आहे. असे असताना स्त्री जातीचे रक्षण करणे हे पुरुषार्थ  सामर्थ्य असते. ज्या ठिकाणी महिलांचा अपमान होतो किंवा स्त्रियांवर अत्याचार होतो, त्याठिकाणची सुंदरता, वैभवता संपून उदासीनता नांदायला लागते म्हणून प्रत्येक धर्मामध्ये महिलांना मान सन्मान देऊन त्यांचे रक्षण करणे हे पुरुषांचे कर्तव्य मानले जाते. ज्या स्त्रिया प्रतिभाशाली आहेत किंवा उच्चशिक्षित आहेत. किंवा उच्च पदावर असतील अशा स्त्रिया स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम असतात आणि यांना हिजाब ची गरज सुद्धा भासत नाही. परंतु जगामध्ये काही नराधमांनी दोन वर्षाच्या मुलीला सुद्धा सोडला नाही, निर्भया सारख्या अनेक घटना या देशात झाल्या. अशा नराधमाच्या वाईट नजरा सुंदर आई - बहिणीवर पडू नये या करिताच हिजाब हा एकमेव उपाय आहे. प्रत्येक धर्मात रूढी आणि परंपरा जनतेच्या कल्याण व जनतेच्या हिताकरिता जोपासली जाते. याला बळजबरी लादणे असे म्हणणे वावगे ठरते. धर्माच्या माध्यमातून जी चांगली गोष्ट बाहेर पडते, त्या गोष्टीला सर्वसामान्यत टिकून राहण्याकरिता संस्कृती असे नाव देणे योग्य ठरते. पूर्वी मुलगी जन्मली तर तिला व तिच्या आवडलानां अभाग्यशाली समजण्यात येते म्हणून व समाजात आपली बदनामी होईल या कारणातून त्या मुलीला जिवंत पुरुन टाकण्याचे पाप त्याचे आई वडील करीत असे. ही एक भयानक आणि निर्दय बाब असली तरी यापेक्षाही जास्त भयानक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, कारण आज तर मुलगी जन्माला येण्याच्या अगोदरच त्या मुलीला पोटातच मारून टाकण्याचे उदाहरण आपणास पहावयास मिळते. आणि म्हणूनच ज्या समाजामध्ये असे होत असेल तर त्या समाजात मुलींची संख्या कमी होतानां दिसत आहे.
                 एकंदरीत सांगावयाचे झाल्यास महिला ह्या सन्माननीय आहेत यांचा सन्मान करणे, यांची रक्षा करणे, यांना सुखी व आनंदित ठेवने, हे प्रत्येक नागरिकांचे, जबाबदार व्यक्तींचे, लोकप्रतिनिधींचे शासकीय अधिकाऱ्यांचे किंवा सर्व राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. यामध्ये कूटनीति किंवा राजकारण केल्यास याचे फळ सर्वांना भोगावे लागतील यात शंका नाही. कारण ज्या ठिकाणी स्त्रियांचा अपमान होतो, त्या ठिकाणच्या जमिनीवर नेहमी उदासिनता वास्तव्यात येते. आणि विकास करणे तर सोडा साधे जीवन जगणे ही कठीण होऊन बसते याकरिता महिलांचा आदर करा अनादर करणेही क्रूरता आहे, अशी शिकवण कुरान शरीफ आणि भगवद गीता मध्ये सुद्धा देण्यात आली आहे. आजच्या काळात स्त्रिया आपले स्वतःचे रक्षण आपल्या - आपल्या परीने करीत आहेत. त्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल ते करू देणे ही काळाची गरज आहे अशीही प्रतिक्रिया शेख खलील बेलदार यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم