दिवसाढवळ्या दागिने लुटणाऱ्या सराईत आरोपीस अवघ्या बारा तासात ठोकल्या पोलीसांनी बेड्या

दिवसाढवळ्या दागिने लुटणाऱ्या  सराईत आरोपीस अवघ्या बारा तासात ठोकल्या पोलीसांनी बेड्या 


14 फेब्रुवारी 2022
महाराष्ट्र 24 न्यूज

हिंगोली जिल्ह्यातील नरसी पोलीस  स्टेशन  हद्दीमध्ये पहेनी या गावात १२ फेब्रुवारी रोजी भर दुपारी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याची घटना घडली होती. 
या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अवघ्या बारा तासात बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव नागोराव सुखदेव श्रीरामे (रा. हनकदरी, ता. सेनगाव) असे असून सदर आरोपीवर दिवसा घरफोडी, चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून, आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे.
आरोपीकडून सोन्याची एकदानी, चांदीचे दोन कडे, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, एक धारदार चाकू असा १,५०,०००/-रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कार्यवाही अवघ्या बारा तासात उघड केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे व नर्सीचे सपोनि अनिल लांडगे यांच्या पथकाचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी विशेष कौतुक केले आहे. दिवसाढवळ्या चोरी झाल्यामुळे परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण होते. परंतु, आरोपीस काही तासातच बेड्या ठोकल्यामुळे नर्सी परिसरातील नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहेत.

 जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना कदापि सोडणार नाही असे पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र24न्यूज ला  बोलताना सांगितले

Post a Comment

أحدث أقدم