सवड जवळ वळण रस्त्यावर जीप उलटून चार विद्यार्थी जखमी
महाराष्ट्र 24 न्यूज
15 फेब्रुवारी 2022
हिंगोली : तालुक्यातील सवड येथून जवळच असलेल्या वळण रस्त्यावर चालकाचे जीप वरील नियंत्रण सुटल्याने जीप उलटून यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालय तोषनीवाल महाविद्यालयामध्ये परीक्षा देऊन चार विद्यार्थी (क्र. एम एच २० ईझेड १३३३) जीपमध्ये सेनगाव येथून हिंगोलीकडे जात होते. सवड जवळील वळण रस्त्यावर जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला एका विहिरीजवळ जाऊन उलटली. जीप विहिरीच्या थोड्या अंतरावरच उलटल्याने मात्र मोठी दुर्घटना टळली आहे.
या अपघातामध्ये जीप चालक प्रशांत सराफ व इतर तीन विद्यार्थी जखमी झाले असल्याने त्यांना तातडीने हिंगोली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
إرسال تعليق