जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप

हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तृतीय पंथीयांना त्यांचे तृतीय पंथी असलयाचे ओळखपत्र आणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे . आणी याच प्रमाणप्रत्राच्या माध्यमातुन त्यांना पुढच्या काळात शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे . जिल्हाधिकारी कार्यालयात मा . जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विजय खरटमोल यांना तृतीय पंथी आसल्ययाचे ओळखपत्र वाटप करण्यात आले त्यावेळी सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण हिंगोली मा . श्री शिवानंद मिनगीरे व श्री राहुल कांबळे व नितीन राठोड उपस्थित होते . मा.जिल्हाधिकारी यांनी तृतीय पंथीय व्यक्तीच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी तृतीय पंथीय व्यक्तीच्या गटांना कौशल्य विकास प्रशिक्षण सत्राचे विषेश आयोजन करण्यात येईल त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व तृतीय पंथीयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाइन संकेतस्थळ transgender.dosje / gov.in वर नोंदणी करण्याचे अवाहन मा . जिल्हाधिकारी यांनी केले

Post a Comment

أحدث أقدم