*हिंगोलीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न*
शिवअभिषेक,ध्वजारोहन,शिवपूजन, शिवज्योत, रक्तदान,कोरोणा लसीकरण,विविध मैदानी खेळ, गौरव पुरस्कार थाटात;जय जिजाऊ जय शिवराय यांच्या घोषणेने पुतळा परिसर दनानला...
प्रतिनीधी-/हिंगोली
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली च्या वतीने चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शिवअभिषेक, ध्वजारोहण,शिव पाळणा,शिवपूजन, शिवगजर, शिवज्योत व शिवछत्रपति गौरव पुरस्कार मान्यवर, शिवप्रेमीच्या उपस्थितीत थाटात पार पडला. जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणेने छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसर दणाणून गेला होता.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने १६,१७,१८व १९ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १० वाजता पुतळा परिसरात पुतळा समिती अध्यक्ष माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या हस्ते पार पडले . सकाळी ९ वाजता भव्य शिवज्योत नरसी नामदेव येथून संत शिरोमणी नामदेव महाराज येथून हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पहाटे महिला वारकरी घेऊन आल्या. ही शिवज्योत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून शहरातील सर्व महापुरूषांना मानवंदना देण्यात आली. यावेळी वारकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. सकाळी १०:३०ते सायंकाळी ५ पर्यंत भव्य रक्तदान शिबिर व कोविड लसीकरण शिबिर पार पडले.या रक्तदान शिबिर २ वाजेपर्यंत २८० लोकांना रक्तदान केले व कोविड लसीकरनात तब्बल एक हजार पाचशे जणांनी लाभ घेतला,तर हे दोन्ही शिबिर रात्री १० वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवछत्रपति गौरव पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा पार पडला.या कार्यक्रमात उलेखनिय कार्य करणाऱ्या साहित्य क्षेत्र पुरस्कार प्रा डॉ माधव जाधव,शैक्षणिक क्षेत्र पुरस्कार वैभव बागर व सुरेश शिंदे, क्रीडाक्षेत्र पुरस्कार नितीन चव्हाण, सामाजिक क्षेत्र पुरस्कार मीराताई कदम, कृषी व पशुपालन क्षेत्र पुरस्कार रामेश्वर मांडगे यांना सन्मानचिन्ह,मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तर १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष पप्पू चव्हाण,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे,सचिव डाॅ. . सतीश शिंदे,कोषाध्यक्ष नितीन अवचार, उपाध्यक्ष शिवाजी मेटकर,मिलिंद उबाळे, दिवाकर माने, रामप्रसाद टेकाळे,सहसचिव बालाजी वानखेडे,प्रीतम सरकटे,प्रसिद्धीप्रमुख पवन जाधव पाटील यांच्यासह मुख्य मार्गदर्शक शिवाजीराव ढोकर पाटील,कल्याण देशमुख,
भूषण देशमुख,ॲड.मनोज आखरे,विनायकराव भिसे पाटील सुनील पाटील गोरेगावकर,मनीष आखरे,ॲड.अमोल जाधव,ड्रॉ.रमेश शिंदे यांची उपस्थिती होती.तर सायंकाळी ६ वाजता भव्य दीपोत्सव सोहळा करून,६:३० ते ७ या वेळेत छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरात नेत्रदिपक आतिषबाजी करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी ७ ते १० वेळेत शिवपोवाडे व शिवागिताचा कार्यक्रम घेण्यात आला.दिवभर झालेल्या विविध कार्यक्रमाला आ.तानाजी मुटकुळे, आ. डाॅ. प्रज्ञा सातव, आ.संतोष बांगर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, तहसीलदार नवनाथ वाघवड, मा. खा. अॅड. शिवाजी माने, मा.आ.गजानन घुगे, रामराव वडकूते, डाॅ. संतोष टारफे, मा.नगराध्यक्ष दिलीप चव्हाण जि.प.उपाध्यक्ष मनीष आखरे, जि.प.सदस्य अजित मगर,युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम,महिला समिती प्रमुख ज्योतीताई कोथळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य स्वरूपाचे कटआऊट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
إرسال تعليق