महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून श्री. नागनाथ मंदिराची तपासणी

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून श्री. नागनाथ मंदिराची तपासणी 


औंढा नागनाथ - अवघ्या काही दिवसांवर महाशिरात्र असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदीर परिसराची शनिवारी बॉम्बशोधक व नाशक पथकाकडूनतपासणी करण्यात आली.

दरम्यान,  देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे  ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथाचे दगडी शिल्पकलेचे सुंदर असे मंदिर तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ या ठिकाणी आहे. एक मार्चला महाशिवरात्र असल्यामुळे हिंगोली येथील बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाने नागनाथ मंदिरातील सर्व परिसराची बॉम्बशोधक उपकरणे व श्वान (राजा) यांच्या सहाय्याने महाशिवरात्री यात्रेनिमित्ताने तपासणी केली .यावेळी हिंगोली बॉम्बशोधक व नाशक पथक हिंगोलीचे पथक प्रमुख  पोलीस उपनिरीक्षक सतीश मुळतकर, सहाय्यक  पोलीस उपनिरीक्षक आर.एल. इंगळे, सहाय्यक  पोलीस उपनिरीक्षक टी.डी. जाधव , संदीप गायकवाड ,एजाज शेख,श्वान( राजा) हे या  बॉम्बशोधक व नाशक या पथकात समावेश होता.

Post a Comment

أحدث أقدم