शासनाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या ओढ्यावर बंधारे बांधकाम सुरू असून सदरचे बांधकाम सरकारी कॉन्ट्रॅक्टरना देण्यात आलेले आहे. सरकारी कॉन्ट्रॅक्टरने बांधकामासाठी खाजगी नोकरा मार्फत काम करून घेतात.. अनेक ठिकाणी काम चालू असल्याने बांधकाम साइटवर कंत्राटदाराचे येने जाने कमी झाल्याने संधी साधून कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी अनखळी शिवारात बंधारा बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून सिमेंट चोरी केल्याची बाब समोर आल्याने पोलीस स्टेशन औंढा येथे संबंधित कंत्राटदाराकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवत सदर बंधाऱ्यावरील सिमेंट व इतर बांधकाम साहित्य चोरणाऱ्या दोन आरोपी नामें वैभव पोले राहणार लासिना, केशव जाधव राहणार हुडी लिंबाळा तालुका सेनगाव यांना पकडून चोरी केलेले 20 पोते सिमेंट जप्त करून औंढा पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाहीसाठी हजर करण्यात आलेले आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. एस. घेवारे, पोलीस अमलदार बालाजी बोके,संभाजी लकुळे, भगवान आडे ,राजू ठाकूर , किशोर कातकडे, शंकर ठोंबरे , विषाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे ,प्रशांत वाघमारे यांनी केली
إرسال تعليق