मालमत्ता संबंधित गुन्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेची उत्कृष्ट कामगिरी

मालमत्ता संबंधित गुन्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेची उत्कृष्ट कामगिरी

महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 
25 फेब्रुवारी 2022
हिंगोली जिल्ह्याला लाभलेले कर्तव्य दक्ष पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारल्या नंतर  पोलिस अधिक्षकांची महत्त्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेत दोन कर्तबगार पोलिस अधीकार्याची नियुक्ती करून जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसवला. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराव व उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी मालमत्ते संबंधी गुन्ह्यात म्हणजे चोरी, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी सारख्या गुन्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करीत 77 गुन्हे उघडकीस आणुन यामध्ये 57 लाख 72 हजारांचा मुद्देमाल रिकव्हर केला आहे. हिंगोली जिल्ह्यात सन 2021 या वर्षा मध्ये घरफोडी चे 15 गुन्हे उघड करून यामध्ये चोरी गेलेला 15 लाख 76 हजार रूपायांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जबरी चोरी मध्ये 4 गुन्हे उघड करून त्यामध्ये चोरी गेलेला 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर चोरीच्या 20 गुन्ह्यातील चोरी गेलेला 24 लाख 34 हजार 700 रूपायांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे असा एकुण 39 गुन्ह्यातील 44 लाख 61 हजार 600 रूपायांचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर सन 2022 या चालु वर्षामध्ये चोरीचे 62 गुन्हे दाखल झाले होते. ज्यामध्ये 31 लाख 86 हजार 575 रूपायांचा मुद्देमाल चोरी गेला होता.ज्यापैकी 30 गुन्हे उघडकरून 10 लाख 86 हजार 350 रूपायांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन 63 आरोपींना अटक केली आहे. तर जबरी चोरीचे 8 गुन्हे दाखल झाली होती. ज्यामध्ये 3 लाख 69 हजार 330 रुपायांचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी 5 गुन्हे उघड करून चोरी गेलेले मालापैकी 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर घरफोडी चे 6 गुन्हे दाखल असुन 3 गुन्हे उघडकिस आले आहेत. चालु वर्षात एकुण 77 गुन्हे दाखल झाली होती. यामध्ये 40 लाख 93 हजार 955 रूपायांचा माल चोरी गेला होता.ज्यापैकी 38 गुन्हे उघडकिस आणुन त्यामध्ये 13 लाख 11 हजार 550 रूपायांचा मुद्देमाल हस्तगत करून 78 आरोपींना अटक केली आहे. सन 2021-22 यावर्षा मध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने  एकुण 57 लाख 72 हजार 950 रूपायांचा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. यामध्ये विशेष म्हणजे सुराणा नगर जबरी चोरी, बियानी नगर मधील अधिकाऱ्याच्या घरात शिरून  केलेली जबरी चोरी, ईराणी टोळीचा पर्दाफाश ,  बाळापुर हद्दीमधील कार मध्ये जाळुन मारलेला मर्डर , कळमनुरी हद्दीतील बॅग लिफ्टिंग अशा अनेक प्रकरणांमध्ये छडा लावण्यात पोलिसांना आवघ्या काही दिवसात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगीरीचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. सदर कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم