चार राज्यात कमळ फुलल्याने भाजप कडून हिंगोलीत जल्लोष
हिंगोली -
चार राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून पंजाब वगळता चारही राज्यात भाजपने मुसंडी मारून विरोधकांना सळो की पळो करून सोडले. त्यामुळे या विजयाचा आनंद हिंगोलीत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे वाटत जल्लोष साजरा केला.
उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड ,पंजाब या पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या ,गुरुवारी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले यामध्ये उत्तरप्रदेश, गोवा ,उत्तराखंड ,मणिपूर या चार राज्यात भाजपचे वर्चस्व राहिले तर पंजाब मध्ये भाजपला सत्ता काबीज करता आली नाही त्यामुळे पंजाब मध्ये भाजपला हार मानावी लागली. या ठिकाणी आपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली.
दरम्यान, चार राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होणार असल्याने या विजयाचा आनंदोत्सव भाजपने येथील गांधी चौकात शनिवारी फटाक्याच्या अतिषबाजीत केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते , माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर , भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, जिल्हा सरचिटणीस मिलिंद यंबल ,के. के. शिंदे, शहर अध्यक्ष प्रशांत सोनी , डॉ. जयदीप देशमुख, उमेश नागरे, बाबा घुगे, संजय ढोके, गजानन कवरखे, यांच्या सोबत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .
إرسال تعليق