भौतिशास्त्र पेपरला ११९ विद्यार्थ्यांची दांडी ; एका कॉपी बहाद्दरावर कारवाई
हिंगोली -
माध्यमिक व उच्य माध्यमिक परीक्षा मंडळाकडून गुरुवारी घेण्यात आलेल्या बारावीच्या भौतिक शास्त्र विषयाच्या परीक्षेला ११९ विद्यार्थी गैरहजर असल्याचे परीक्षा विभागाकडून सांगितले.
इयत्ता १२ वी भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षा ३९ केंद्रावर घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी ५५८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५४६४ विद्यार्थी उपस्थित तर ११९ विद्यार्थी गैरहजर होते. आज जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या पथकाने एका कॉपीबहाद्दरांना कॉपी करत असताना पकडले व त्यावर कार्यवाही करण्यात आली. तसेच तर्कशास्त्र या विषयासाठी ३६२ विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यापैकी ३५१ विद्यार्थी उपस्थित तर ११ विद्यार्थी गैरहजर राहिले एक कॉपी प्रकरण वगळता जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पडली.
إرسال تعليق