जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध
हिंगोली /-
जिल्हा युवक कॉंग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव भाजपा सरकारच्या कार्यकाळात सतत वाढतच आहे. त्यामुळे जिवन आवश्यक सर्व वस्तूंचे भाव वाढले असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना याची झळ सोसावी लागत असल्याने फार मोठ्या अडचणींना जनतेला सामोरे जावावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान हे शहरी भागांतील अनुदाना प्रमाणे ग्रामीण भागातील लाभार्थी यांना देखील २ लाख ६५ हजार रुपये देण्यात यावे, या आशयाचे निवेदन हिंगोली युवक कॉंगेस अध्यक्ष बालाजी करडीले पाटिल आणि सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले.
यावेळी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाउपाध्यक्ष सुधीर अप्पा सराफ, कलीम गुड्डू, विलास गोरे, पाशा पटेल, साद अहमद, बंटी नागरे, अक्षय डाखोरे, ताहेर शेख, नस्रूला खान, मोहमद परवेझ, काळे, औंढेकर, प्रभाकर नांगरे, असोलेक, विठ्ठल जाधव, सचिन मस्के, शुभम सराफ, संजय काळे, शासन कांबळे, संतोष साबळे, जयदीप दीपके, भोला सिंग सरपंच, मस्तान चाऊस, अयाज नाईक, फैयाज, तौकीर कादरी, सचिन पोले, सचिन गाढवे, घनशाम हराळ, मंचक सावळे, फारुख पठान, संतोष सावळे, तौकीर कादरी, अनिस शेख, गणेश मोरे, खलील शेख, विशाल वायकुळे, वैभव सावके, अभिषेक चव्हाण, आमोल जगताप, विकी देशमुख, मारोतराव शिंदे, संतोष चांदने, गजानन आठवले, नितेश आठवले, नितिन गालफाडे, बंडु मुकाडे, किसन करडीले, विशाल कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق