*जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली प्रहार जनशक्ती पक्षाचे डफडे बजाओ आंदोलन यशस्वी*
महाराष्ट्र 24न्यूज
दि.01 एप्रिल 2022 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील सर्वसामान्य रुग्णांची होत असलेल्या हेळसांड प्रसंगी यामध्ये डॉक्टर्स कर्मचारी वेळेवर ड्युटी बजावत नाहीत रुग्णालयात मोठ्याप्रमाणावर स्वच्छतेचा अभाव,पिण्याचे पाणी,सोनोग्राफी ,मेडिसिन चा तुटवडा,ओपीडी व्यवस्थित वेळेवर चालू नाही,रुग्णांना उपचार बरोबर मिळत नाही मेडिसिन व इतर साहित्य बाहेर मेडिकल वरुन रुग्णांच्या नातेवाईकांना आणण्यात लावतात,अशा मोठ्या प्रमाणावर रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे अशा अनेक समस्येबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने डफडी बजाओ आंदोलन सकाळी 11 वा करण्यात आले त्यानंतर तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन सर्व समस्येबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यवंशी यांनी लेखी पत्र दिले आंदोलन तात्पुरते रद्द करण्यात आले परंतु येणाऱ्या 15 दिवसात समस्येचे निवारण न झाल्यास वरिष्ठ कार्यालया च्या समोर जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आंदोलनकर्ते कडून इशारा देण्यात आला यावेळी युवा जिल्हाप्रमुख रवि ऊर्फ राॅबट बांगर,प्रहारचे जिल्हा संघटक विलास आघाव, प्रहार अपंग जिल्हाध्यक्ष प्रदिप वानरे,युवा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पांडुरंग कराळे,भागवत शिनगारे, युवा तालुकाध्यक्ष बंटी पाटील,युवा ता.सचिव जिवन आडे,युवा ता.सचिव पवन राठोड, युवा ता.उपाध्यक्ष विष्णू चव्हाण,वैभव आघाव,अक्षय काळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
إرسال تعليق