हिंगोलीत लक्ष्मी लाईफ लाईन केअर हॉस्पिटल मध्ये 131 रक्तदात्यांनी केले रक्तदान

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे होत असलेल्या रक्ताचा तुटवडा शहरांमध्ये भरपूर जाणवत असल्याने शहरातील तरुण डॉक्टर श्री अखिल अग्रवाल व माधव सपाटे पहेल्वान यांनी  सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल व पैलवान माधव सपाटे मित्र मंडळामार्फत हिंगोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा या लोकांनी अतिशय भरभरून 
प्रतिसाद दिला .शिबीर शिबिरास श्री दिलीप चव्हाण श्री मनोज आकरे श्री सुरेश अप्पा सराफ जगजित राज खुराना डॉक्टर श्रीधर कंदी , एडवोकेट मनिष साखळेया मंडळींनी भेट देऊन सदिच्छा दिल्या. या शिबिरामध्ये एकूण....127... एवढ्या रक्तदात्यांनी 
स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर मयुर अग्रवाल डॉक्टर मंगेश मुंडे हिंगोली पैलवान  माधव सपाटेमित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी भरपूर परिश्रम घेतले. याप्रसंगी डॉक्टर अखिल अग्रवाल व त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी सुरुवातीलाच रक्तदान करून एक नवीन पायंडा निर्माण केला याबद्दल उर्वरित रक्तदात्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم