महिलेवर अत्याचार; राष्ट्रीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकावर गुन्हा दाखल
हिंगोली सेनगाव येथील एका महिलेचे मोबाईल वर छायाचित्र काढून धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका शिक्षकावर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात १ एप्रिल रोजी मारोती शिवाजी कोटकर या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढून धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील वाघजाळी येथील एक महिला तिच्या कुटुंबीयांसोबत सेनगाव येथे वास्तव्यास राहत होती. मागील चार वर्षापूर्वी त्याच भागातील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मारोती शिवाजी कोटकर याने त्या महिलेस मी तुमचा नातेवाईक आहे असे सांगून तिच्याशी जवळीक
साधली
त्यानंतर त्या महिलेचा पत्ती घरी नसताना महिलेच्या घरी जाऊन तिचे मोबाईल वर छायाचित्र देखील काढले. सदर छायाचित्रे दाखवून धमकी देऊन त्या महिलेवर सतत अत्याचार केले. दरम्यान, काही दिवसापूर्वी सदर महिलेला उपचारासाठी हिंगोली येथे आणले असताना मारोती कोटकर याने त्या महिलेशी संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर महिलेस अहमदनगर नाशिक, दापोली व इतर ठिकाणी नेऊन अत्याचार केले. . महिलेस फ्लॅट घेऊन देतो तसेच शेती नावावर करून देतो असे आमिष दाखवले. दरम्यान या प्रकरणात महिलेच्या त्या कुटुंबियांनी हिंगोली ग्रामीण
पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. यामध्ये पोलिस अधिक्षक राकेश व कलासागर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक ब एस. एम. मुपडे, सहाय्यक हो पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल भडंगे , जमादार रविकांत हारकळ, आकाश पडितकर, अशोक धामणे, यांच्या पथकाने त्या महिलेचा शोध सुरू केला होता. सदर महिला सापडल्यानंतर तिने यासंदर्भात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मारोती कोटकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एम. मुपडे पुढील तपास करीत आहेत.
إرسال تعليق