हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस हद्दीत दोघांचा खून पोलीस दलात खळबळ
गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीसांच्या फौजफाटा तैनात असुन पुढील तपास पोलीस करीत आहे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत दि 5 एप्रिलच्या मध्यरात्री दोन खुनाच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे गोरेगाव येथील बसस्थानक परिसरात खुन झालेला युवक राजस्थान भिलवाडा येथील असुन मागील विस वर्षांपासून तो गोरेगाव येथे ज्युस सेंटर चालवत होता. तर दुसरी एक खुनाची घटना गुगुळपिप्री येथे घडली असुन गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एकाच रात्री दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरीकांमध्ये भितीच वातावरण पसरले आहे.दोन्ही ठिकाणी खुन झालेल्या घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक वाखारे,श्वानपथक,तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रिदेवी पाटील,पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव, यांनी भेट दिली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.खुन झालेल्या ठिकाणी नागरीकांनी एकच गर्दी केली होती गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत दोन खुनाच्या घटना घडल्याने गोरेगाव परीसरात एकच खळबळ उडाली असुन परीसरात गुन्हेगारी वाढल्याने नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे.
إرسال تعليق