हिंगोलीच्या युवती मोर्चा जिल्हाध्यपदी अंकिता दुबे
हिंगोली - प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी येथील अंकिता दुबे यांची सोमवारी जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांनी नियुक्ती पत्राद्वारे निवड केली आहे.
यापूर्वी अंकिता दुबे यांनी भाजपात राहून तळागाळातील लोकांना पक्षांच्या विचाराशी समरस करून पक्ष वाढीसाठी जोडण्याचा प्रयत्न केला.आपण केलेल्या कार्याची पक्षाने दखल घेत युवती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. पक्षाची ध्येय धोरणा प्रमाणे काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, शिवदास बोड्डेवार, पांडुरंग पाटील, उज्वला तांभाळे, दुर्गादास साखळे, ऍड. भाकरे , कृष्णा रुहाटीया , फुलांजी शिंदे, आदींची उपस्थिती होती.
إرسال تعليق