आश्वासनानंतर श्रीकृष्ण नगर येथील नागरिकांचे उपोषण मागे
हिंगोली /-
शहरालगत असलेल्या श्रीकृष्णनगर येथील रहिवाशांचे पाणी टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालया समोर गुरुवारी उपोषण सुरू केले होते. मात्र पालिकेच्या सीओ यांच्या लेखी आश्वासना नंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतले.
शहरालगत असलेल्या श्रीकृष्णनगर येथे मागच्या काही दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या नगरात अद्याप नळयोजना झालेली नसल्याचे या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच नगरपालिकेने शहरा लगत असलेल्या काही ग्रामपंचायतला पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या श्रीकृष्ण नगर येथे मात्र पाणी पुरवठा अद्याप सुरू केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
या नगरातील बोअरवेल आटले आहेत तर काही बोअरवेल मधून दुर्गंधी युक्त पाणी येत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याबाबत दखल घेऊन दि.११ मे पर्यंत उपाययोजना कराव्यात अन्यथा बारा मे पासून उपोषण करण्याचा इशारा यापूर्वी संतोष दराडे, विष्णु कुमार जाधव, प्रदिपकुमार जैस्वाल, शंकर पोले, गजानन गिते, जे.एस.कर्हाळे, नारायण पोले, जगदीश कंरडे, एस.आर.गुठ्ठे, आर.डी.मोरगे, संतोष भिसे, लक्ष्मण दराडे, आनंद काकडे आदीनी दिलेल्या निवेदनात करण्यात आला होता.
मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गुरुवारी श्रीकृष्ण नगर येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, संजय दराडे, राम कदम यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पालिकेने लेखी आश्वासन दिल्याने कृष्ण नगर येथील नागरिकांनी उपोषण मागे घेतले.
إرسال تعليق