हिंगोली बसस्थानकात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट प्रवासी झाले व्याकुळ

हिंगोली बसस्थानकात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट प्रवासी झाले व्याकुळ 

हिंगोली प्रतिनिधी 
14मे शनिवार 2022

राज्यांमध्ये 22 एप्रिल पासून महामंडळाच्या बस प्रवासासाठी   उपलब्ध झाले असून सध्या कार्यरत आहेत 
हिंगोली बस स्थानकातून फक्त 44 गाड्या इतर जिल्ह्यासाठी व स्थानिक जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेले आहेत 
मात्र बस स्थानकावर प्रवाशांना पाणी पिण्यासाठी एक घोट सुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही 
व्यवस्थापक चौतमाल यांनी सांगितले की आमच्या बोरचे पाणी संपूर्णपणे आटलेल्या आहे 
त्यामुळे आम्ही प्रवाशांना पाणी उपलब्ध करून देऊ शकत नाही 

टँकरद्वारे पाणी मागण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये टँकर वाल्याकडे बिलाचे लेटर पॅड  नसल्याने एकही टँकर पाणी पुरवण्यासाठी तयार होत नाहीत 
दोन वयोवृद्ध प्रवाशांना बसस्थानकामध्ये पिण्याचे पाणी नसल्याने 
त्यांना स्वतः पोलीस कर्मचारी शुक्ला यांनी पिण्याचे पाणी दिले 
तर एक जण जागेवर चक्कर येऊन पडला होता 
प्रवाशांना विकत पाण्याचा भुर्दंड 

बस व्यवस्थापकाचे नियोजन नसल्याने
प्रवाशांचे बे हाल होत  आहेत 

मागील दोन वर्षापासून कोरोना काळात ह्या संपूर्ण बस बंद असल्याने 
 संघटनेच्या विविध मागण्यासाठी  संपामुळे अनेक बस मोठ्या प्रमाणात नादुरुस्त आहेत 

बस प्रवाशांचे तिकिट  महागले प्रवासी  आले अडचणीत 
प्रवासी संघटना मूग गिळून गप्प आहेत 

हिंगोली आगारात 100 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये बस चालक वाहक 
कार्यालयीन कर्मचारी त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण नसल्याने अनेक बस वेळेवर प्रवाशांसाठी उपलब्ध होत नाहीत 

हिंगोली बस आगाराची रोजचे लाखोचा उत्पन्न असूनही  प्रवाशांना मात्र कोणतीही सुविधा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे 

 बस स्थानकात दारुडे  चोरटे संख्या दिवसेंदिवस वाढत आहे 

चौ तमल यांनी सांगितले की आम्ही प्रवाशांना लवकरच पाणी उपलब्ध करून देऊ 
प्रवाशांना वेळेवर पाणी मिळेल का असाही प्रश्न पडला आहे

Post a Comment

أحدث أقدم