पूर्णा नदीच्या पात्रात बहिण-भावाचा बुडून मृत्यू चौकशी करून शासनाकडून मदत करू तहसीलदार जीवन कुमार कांबळे
हिंगोली प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील बोडखा येथील बहिण-भावाचा पूर्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सेनगाव तालुक्यातील बोडखी येथे समोर आली आहे
गुरुवारी सकाळी बाराच्या दरम्यान ही घटना घडली
बहिणीच्या पाय घसरून ती नदीत पडली असता तिला बाहेर काढण्यासाठी भावाने उडी घेतली होती
मात्र भावाला पोहता येत नसल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे
विशाखा गुलाब राठोड वय सात वर्षे गोपाल राठोड वय दहा वर्षे अशी बहीण भावाचे नावे आहेत
गुलाब राठोड यांच्याकडे मोठ्याप्रमाणात शेळ्या आहेत वडिलांना बाहेरगावी काम असल्याने विशाखा व गोपाळा शेळ्या राखण्यासाठी सांगितले होते
शेळ्या पूर्णा पत्रावर पाणी पिण्यासाठी गेले असता विशाखा चा नदीपात्रात पाय घसरून पडली असता तिला बाहेर काढण्यासाठी तिच्या भावाने नदीपात्रात उडी घेऊन वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र पोहायला येत नसल्याचे भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला
आपले दोन्ही मुले घरी का आली नाही आई-वडिलांनी इतरस्त पाहणी केली असता दोघांचे नदीपात्रात मृतदेह आढळले
या दुर्दैवी घटनेमुळे बोडखा गावावर शोककळा पसरली होती
धोनी बहिण-भावाचा मृत्यू प्रकरणी चौकशी करून त्यांना लवकरच मदत करू असे तालुका दंडाधिकारी जीवन कुमार कांबळे यांनी महाराष्ट्र 24 न्यूज बोलताना सांगितले
إرسال تعليق