*हिंगोली जिल्ह्याने राज्यात माता व बाल संगोपन कार्यक्रम अंतर्गत तिसरा क्रमांक पटकावला
सन 2021-22 या वर्षात
मा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय दैणे व मा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी
वैद्यकीय अधिकारी डॉ गोपाल कदम व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ सचिन भायेकर यांनी हिंगोली जिल्ह्यात कोविड 19 च्या काम करून सदर कालावधीत जिल्ह्यात माता,बालसंगोपन, कुटुंब कल्याण, लसीकरण,नवजात बालकांच्या सेवा, अतिदक्षता विभाग, संस्थात्मक प्रसूती, सिझर,डायलेंसिस,इत्यादी च्या सेवा उत्कृष्ट व दर्जेदार दिल्या बदल हिंगोली जिल्ह्याचा महाराष्ट्रातुन तिसरा क्रमांक आला आहे या बदल मा संचालक आरोग्य सेवा डॉ अर्चना पाटील मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हा सत्कार म्हणजे जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आधीपरिचारिका आरोग्य सहाय्यक स्त्री /पुरुष, आरोग्य कर्मचारी स्त्री पुरुष यांच्या कामाचे फलित आहे.
إرسال تعليق