मुलींच्या वसतीगृहातील आर्थिक व आहार विषयक समस्या सोडविण्याची मागणी
हिंगोली प्रतिनिधी
24मे2022
अकोला बायपास भागातील मागासवर्गीय मुलींचे जुने वस्तीगृहात मागील चार महिन्यापासुन शैक्षणिक खर्च व मासिक भत्ता मिळाला नसल्यामुळे अडचणी उदभवत आहेत. त्यामुळे या वस्तीगृहाच्या आर्थिक व आहार विषयक समस्या सोडविण्याची मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहे.
मागासवर्गीय मुलींचे जुने वस्तीगृह अकोला बायपास येथे मागील चार महिन्यापासुन शैक्षणिक खर्च व मासिक भत्ता मिळाला नसल्यामुळे अडचणी उदभवत आहेत. या वस्तीगृहाच्या मुलींना व्यवस्थित नाष्टा व जेवण व्यवस्थित देण्यात येत नाही. नाष्टयामध्ये फळांचा व दुधाचा समावेश नसतो. तसेच २०१९-२० या वर्षातील निर्वाह भत्ता, स्टेशनरी खरेदी करण्यासाठी भत्ता मिळालेला नाही. याची चौकशी करुन हया समस्या सोडविण्याची मागणी येथील मुलींच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सिमा पाईकराव, दुर्गा चिंडके, नागेश्री हनुमंते, पुजा पाईकराव, तेजस्वीनी सोनटक्के, अस्मिता खिल्लारे, निकिता खरात, शितल भिसे, प्रतिक्षा उन्हाळे, खुशी बनसोडे, कविता खंदारे, स्नेहा डोंगरे, पुजा सावळे, आरती माघाडे, पुजा फुंडसे, पुजा खिल्लारे, स्वाती किर्तने, पुजा बगाटे, सोनुताई जाधव, स्वाती राठोड, प्रियंका कांबळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
إرسال تعليق