सतर्क हिंगोली पोलीसांची उल्लेखनिय कामगीरी घरातुन निघुन गेलेले बालक तात्काळ पालकांना मिळू शकले
हिंगोली प्रतिनिधी
25मे2022
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. एम. राकेश कलासागर यांचे नेतृत्वात नेहमीच हिंगोली पोलीस सतर्क राहुन कर्तव्य करीत असुन त्याचाच प्रत्यय मागील दोन दिवसापासुन आला असुन पालकांपासुन अचानक दुर झालेले बालक सतर्कपणे कर्तव्य करीत असलेल्या पोलीसांच्या प्रयत्नामुळे तात्काळ पालकांचे जवळ आले.
त्याबाबत माहीती अशी कि, दिनांक २४/०५/२०२२ रोजी मौ. कासारखेडा ता. अर्धापुर जि. नांदेड येथील संतोष डुकरे यांचा ०९ वर्ष वयाचा मुलगा जो घरी पालकांनी सायकल विकत घेवुन देत नाहीत म्हणुन नाराज होवुन घरातुन कोणालाही न सांगता निघुन गेला होता. नमुद मुलाचे पालक व्याकुळ होवुन बालकाचा शोध घेत होते. काही वेळानंतर नमुद बालक जवळपास २० कि.मी. पायी चालुन कर्तव्यावर असलेल्या वसमत ग्रामीण पोलीसांना इंजनगाव परीसरात पायी जात असतांना मिळुन आला पोलीसांनी त्यास जवळ घेवून आपुलकीने विचारपुस करून घटनेची माहीती घेवून त्याबाबत तात्काळ अर्धापुर पोलीस व नमुद बालकाचे आई वडीलांना संपर्क करून तात्काळ मुलास त्यांचे ताब्यात सुरक्षीतरीत्या दिले. सदर कामगीरी वसमत ग्रामीण पो.स्टे. चे सपोनि रवी हुंडेकर, पो. ना. अजय पंडीत / ८२९, शेखज जावेद / ६४१ यांनी केली
तर आज दिनांक- २५/०५/२०२२ रोजी एक मुलगी एक दिड ते दोन वर्षाची लहान जिला बोलता येत नव्हते अशी तिचे आई वडीलांसह हिंगोलीत नातेवाईकांकडे आली असतांना अचानक खेळत खेळत बाहेर निघुन गेली होती. नमुद मुलगी वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार श्री. रूपेश धाबे / ९३० हे हिंगोली शहरामध्ये सतर्कतेने कर्तव्य करीत असतांना त्यांना अंबिका टॉकीज रोडवर रडत असतांना मिळुन आली. लगेच कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार रूपेश धाबे यांनी नमुद मुलीस जवळ घेवून आपुलकीने बोलुन तिला शांत केले व •परीसरात फिरून नमुद मुलींच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सदर ठिकाणा वरून ग्रामीण भागात वाहने जातात त्यांचेकडेही जावुन चौकशी केली. परत गांधी चौक परीसरातील बाजारात सुध्दा फिरून लोकांकडे नमुद मुलीचे पालकां बाबत माहीती त्याबाबत काही व्हॅटसअप ग्रुपवर सुध्दा त्यांनी संदेश पाठवुन मुलीचा शोध घेण्याचा तत्परतेने प्रयत्न केला तेव्हा साधारण एक तासानंतर व्हॅटसअप ग्रुपवरील संदेशावरून नमुद मुलीचे पालकांचा शोध लागला व ती लोहगाव येथील श्रावण संतोष महाजन यांची मुलगी असल्याचे माहीती मिळाले वरून नमुद मुलीचे पालकांना पोलीसांनी फोन करून बोलावुन घेवुन नमुद मुलीस सुखरूपपणे आई वडीलांच्या ताब्यात दिले. दुरावलेला बालक परत जवळ आल्याने पालकांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. नमुद दोन्ही घटनेत सतर्क हिंगोली पोलीसांमुळे घरातुन निघुन गेलेले दोन्ही बालक तात्काळ आई वडीलांना मिळु शकले नमुद बालकांचे पालक व परीसरातील नागरीकांनी संबंधीत पोलीसांचे भावनिक होत आभार मानले.
إرسال تعليق