आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या बैठकीत पत्रकाराच्या विविध मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा

आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या बैठकीत  पत्रकाराच्या विविध  मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा

हिंगोली -  आंबेडकर प्रेस  कौन्सिल महाराष्ट्र राज्य शाखा हिंगोलीच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी २५मे रोजी आंबेडकर प्रेस कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष ऍड. रावण धाबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला पत्रकार संतोष जाधव, दिलीप हळदे, प्रा. यू. एच. बलखंडे,विलास जोशी, सुधाकर वाढवे, दयासील इंगोले, प्रल्हाद शिंदे, गणेश बगाटे, रवी शिखरे, नितीन धाबे, आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ऍड. धाबे म्हणाले,आंबेडकर प्रेस कौन्सिल संघटनेत श्रमिक पत्रकार मोठ्या प्रमाणात असून त्यांना राहायला घर देखील नाही. अशा पत्रकारांसाठी शहरात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण परिसरात व विविध ठिकाणी शासकीय भूखंड मोठ्या प्रमाणात आहेत. शासनाने पत्रकारांसाठी दीड एकर जमीन दिल्यास त्या ठिकाणी गृह निर्माण सोसायटी निर्माण करून श्रमिक पत्रकार यांच्यासाठी निवासस्थान उभे करण्याचा ठराव पारीत करण्यात आला .या ठरावाला सर्व पत्रकारांनी संमती दर्शवली आहे. तसेच पत्रकारासाठी अद्यायावत पत्रकार हिंगोली ठिकाणी नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज पत्रकार भवन उभारल्यास शासकीय पत्रकार परिषद असो किंवा लोकप्रतिनिधी ,मंत्री मोहदयाच्या असो या पत्रकार भवनात घेता येतील असा ठराव उपस्थित केला असता त्यावर एकमताने चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली. 

दरम्यान, आता या दोन्ही महत्वपूर्ण मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जून महिन्यात मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार  ऍड. धाबे यांनी बैठकीत सांगितले. आता येणाऱ्या चार जूनच्या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم