स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही जनावरे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही जनावरे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड हिंगोली जिल्हयातील ०६ गुन्हे उघडकिस , ०३ आरोपींना अटक ७ लाख ४८ हजार रु . चा मुद्देमाल जप्त . हिंगोली जिल्हयामध्ये अनेक शेतक - यांची जनावरे चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या . त्याबाबत पो.स्टे . हिंगोली शहर , सेनगाव , गोरेगाव , औंढा नागनाथ , वसमत ग्रामीण येथे गुन्हे दाखल होते , नमुद जनावर चोरणारी टोळीला पकडुन नमुद गुन्हे उघड करणे व जनावर चोरीच्या घटनांना आळा घालने याचे पोलीसांपुढे आव्हाण निर्माण झाले होते .. मा . पोलीस अधीक्षक हिंगोली श्री एम . राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस नमुद जनावर चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत व सदर गुन्हेगारांची टोळीला पकडण्याबाबत आदेश देवुन वेळोवेळी मार्गदर्शन केले होते . त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथकाने जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्हयांचा घटनास्थळ व परीसराचा व असे गुन्हे करणा - या आरोपींबाबत गोपनीय रित्या माहीती घेवुन व तंत्रशुध्द तपास पध्दती व सायबर सेल हिंगोली यांचे मदतीने नमुद गुन्हे करणारी टोळीबाबत माहिती काढुन सदर गुन्हे नांदेड शहर व भिवंडी शहरातील आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथकाने गुन्हयातील मुख्य आरोपी १ ) मोहम्मद अहेमद मोहम्मद हुसेनसाब रा . मदिना नगर , नांदेड ( खाटीक ) व त्याचे साथीदार २ ) मोहम्मद ताहेर मोहम्मद इक्बाल रा . मिन्नत नगर नांदेड ३ ) साबेर लालडेसाब शेख रा . सलाटर हाउस इदगाह रोड भिवंडी जि . ठाणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी नमुदचे जनावर चोरीचे गुन्हे त्यांचे इतर तिन साथीदार ४ ) इसाक कुरेशी उर्फ भैया पि.सत्तार कुरेशी रा . शांतीनगररोड दांडेकरवाडी ठाणे ५ ) अन्सारी यातीपुर रहेमान शोयब यातीपुर रेहमान रा . अन्सारीनगर दांडेकरवाडी ठाणे ६ ) शेख सलीम रा . कल्याण यांच्या सोबत मिळुन त्यात यातील भिवंडी येथील सहभागी चार आरोपी है । गुन्हे करण्यासाठी भिवंडी येथुन नांदेड येथे रेल्वेने येत होते व यातील आरोपी क्र . ०१ मुख्य आरोपी यांचेसोबत मिळुन ते जनावरे चोरीचे गुन्हे करून चोरून नेलेली जनावरे यातील आरोपी क्र . ०१ यास विकुन त्यानंतर आरोपी क्र .०१ हा सदर चोरी केलेले जनावरे कापुन विक्री करीत होता व गुन्हयातील जनावरे चोरून त्यातुन मिळालेले पैसे आपसात वाटुन घेत होते असे सांगीतले . आरोपींनी विचारपुस दरम्यान हिंगोली जिल्हयातील खालील गुन्हयांची कबुली दिली आहे *. १ ) पो.स्टे . हिंगोली शहर गुरनं . ५६ / २०२२ कलम ३७ ९ भादंवी , २ ) पो.स्टे . सेनगाव गुरनं . २१० / २०२१ कलम ३७ ९ भादंवी . नाही पा ३ ) पो.स्टे . औंढा नागनाथ गुरनं . १३० / २०२१ कलम ३७ ९ भादंवी . मायाम ४ ) पो.स्टे . गोरेगाव गुरनं . १३३ / २०२१ कलम ३७ ९ भादवी . ५ ) पो.स्टे . गोरेगाव गुरनं . ४४ / २०२० कलम ३७ ९ भादंवी . ६ ) पो.स्टे . वसमत ग्रामीण गुरनं . ५७ / २०२० कलम ३७ ९ भादंवी* आरोपीकडुन तपासादरम्यान गुन्हयात जनावरे चोरून विक्री करून मिळालेली रक्कम आपसात वाटुन घेतलेली रक्कम नगदी रु . २,३०,००० रु . आणि गुन्हयात वापरलेली बोलेरो पिकअप वाहन किंमत ५,००,००० रु . आरोपीतांचे ०३ मोबाईल १८,००० रू असा एकुण ७,४८,००० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे . नमुद आरोपींनी विचारपुस दरम्यान हिंगोली जिल्यासह नांदेड शहर व परिसरातही जनावरे चोरीचे गुन्हे केल्याचे सांगीतले आहे . सदरची कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक श्री एम . कलासागर , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे , सहा . पोलीस अधीक्षक श्री . यतीश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो . नि . श्री . उदय खंडेराय , स.पो.नि. राजेश मलपिलु , सुनिल गोपिनवार , पोउपनि . भाग्यश्री कांबळे व पोलीस अंमलदार बालाजी बोके , संभाजी लेकुळे , भगवान आडे , किशोर कातकडे , राजुसिंग ठाकुर , किशोर सावंत , विठ्ठल काळे , आकाश टापरे , ज्ञानेश्वर सावळे , सुमित टाले , शेख जावेद , तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा , हिंगोली यांनी केली आहे 

Post a Comment

أحدث أقدم