पोलीस दलाकडून ४० ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणार
राकेश कलासागर
हिंगोली - जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या घटना महामार्ग पोलीस नव्हे तर आता पोलीस दलाकडून ४० ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले.
हिंगोली ते सेनगाव या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. तर हिंगोली ते कण्हेरगाव या मार्गावर देखील अपघाताच्या घटनांची मालिका सुरू आहे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, उपप्रादेशिक कार्यालय यांच्याबरोबरच आता पोलीस विभागाकडून घटनेच्या जागी साइन बोर्ड व स्पीड ब्रेकर लावणार असून तशा सूचना पोलीस अधिकारी यांना दिल्याचे कलासागर यांनी सांगितले. तसेच हिंगोली ते कण्हेरगाव या मार्गावर व सेनगाव मार्गावर ४० ठिकाणी पॉईंटची यादी तयार करून ज्या ठिकाणी अपघाताची श्यक्यता आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर , बॉरकेर्टिंग लावले जाणार आहेत. सोमवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार , उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अनंता जोशी यांची बैठक घेऊन अपघात टाळण्यासाठी आपल्या स्तरावर काय उपाययोजना करता येतील त्या ठिकाणी कराव्या अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना पोलीस अधीक्षकांनी सूचना करत महामार्गांवरील वळण रस्त्यांवर बॅरिकेटस लावून नागरिकांकडून नियमांचे पालन करून घेण्याचे आदेश राकेश कलासागर यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत, दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे
إرسال تعليق