हिंगोली शहरात तीन आरोग्य वर्धिनी केंद्रास मंजुरी
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांची माहिती
महाराष्ट्र 24 न्यूज
31मे2022
हिंगोली शहरात तीन आरोग्य वर्धिनी केंद्रास मंजुरी मिळाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी दिली आहे.
हिंगोली शहरासाठी सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयासह दोन नागरी दवाखाने कार्यान्वित आहेत. कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यामुळे हिंगोली · शहरासाठी अधिक चार केंद्राची. मागणी करण्यात आली होती. हिंगोली शहरातील मंगळवारा, गणेशवाडी रिसाला, जिजामातानगर या ठिकाणी तीन आरोग्य वर्धिनी केंद्रास मंजुरी मिळाली असून ही केंद्रे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी दिली आहे. या • परिसरातील रुग्णांना उपचारासाठी उपयोग होणार आहे.
إرسال تعليق