हिंगोलीतओबीसी आरक्षणाच्या निषेधार्थ भाजपाचे लाक्षणिक उपोषण



ओबीसी आरक्षणाच्या निषेधार्थ भाजपाचे लाक्षणिक उपोषण 

हिंगोली प्रतिनिधी 
मध्यप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम राहण्या करिता इम्पेरिकल डेटा व ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टात तात्काळ दाखल करावा. आघाडी सरकारचा निषेध करत भारतीय जनता पार्टीच्यावतीने सोमवार दि.२३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. निषेधाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा लाभ मिळाला पाहीजे. राज्य सरकारच्या नाकर्ते पणामुळे राजकीय आरक्षण रद्द करुन ओबीसी समाजावर अन्याय केला  आहे. एकीकडे मध्यप्रदेश येथे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण देण्यात आले असुन महाराष्ट्र राज्यात मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच येत्या २५ मे रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी समाजावर झालेल्या राजकीय आरक्षण संबधी झालेल्या अन्याया विरोधात आघाडी ठाकरे सरकारच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सदस्य मा. आ.गजानन घुगे यांनी केले आहे. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा.ऍड.शिवाजी माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आ.गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, बबनराव गीते, जिल्हासघंटन सचिव फुलाजी शिंदे, मिलिंद  यंबल, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू  चव्हाण, पांडुरंग पाटील, ऍड.के.के.शिंदे, संतोष टेकाळे, प्रशांत सोनी, हमिद प्यारेवाले, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष नाईक, सरचिटणिस संदिप वाकडे,  बाबा घुगे, शाम खंडेलवाल, शंकर बोरुडे, अमोल जाधव, लखन गोरे, महेश शहाणे, दारासिंग राजपूत, बाळासाहेब उपाळे, आत्माराम राठोड, पिंटू सोनटक्के, प्रवीण जैन, तुकाराम मस्के, कैलास खर्जुले, शंकर मुधोळकर, उज्ज्वला  खोलगाडगे, विठ्ठल बांगर, आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.


Post a Comment

أحدث أقدم