मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या संकल्पनेतुन "स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस, सक्षम पोलीस" अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
23मे2022सोमवार
हिंगोली प्रतिनिधी
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. एम. राकेश कलासागर यांनी जिल्हा पोलीस दलातील कार्यरत अधिकारी व अंमलदार यांचे आरोग्य सुदृढ रहावे तसेच काही आरोग्या समस्या असतील तर त्याचे वेळीच निदान व विलाज होऊन जिल्हातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अधिक समक्षपणे कर्तव्य करावे हया उददेशाने नेहमीच विवीध आरोग्य विषयक उपक्रम घेत असतात. त्याच अनुषंगाने “स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस, सक्षम पोलीस" या संकल्पनेतुन जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी संत नामदेव सभागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथे दि. २३/०५/२०२२ ते दि. २५/०५/२०२२ पोवेतो ०३ दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबाराचे आयोजन केले आहे.
सदर आरोग्य तपासणी शिबीराचे आज रोजी संत नामदेव सभागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथे मा.पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर व मा. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्री. राजेंद्र सुर्यवंशी हिंगोली यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले असुन सदर कार्यक्रमास मा. सहायक पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. श्री मंगेश टेहरे, डॉ. श्री गोपाल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर आरोग्य शिबीरात जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व विभागीतील तज्ञ डॉक्टर्स व त्यांचे अधिनस्त स्टाफने अत्याधुनिक हजर राहुन जिल्हयातील एकुन ६९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य विषयक औषधोपचार व सल्ला दिला. मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस अंमलदारांच्या आरोग्यास प्रथम प्राधाण्य देवुन काळजी घेत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केल्यामुळे सदर शिबराचा लाभ घेतलेल्यांनी आंनदी होवुन आभार व्यक्त केले. सदर आरोग्य शिबारीचे आयोजन व यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक श्री. पंडीत कच्छवे व सहा. पोलीस निरीक्षक श्री. रवी हुंडेकर यांनी प्रयत्न केले.
إرسال تعليق